Maharshtra Breaking News : पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हा
शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. अशाच राजकीय आणि इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी मुंबई तकचा हा लाइव्ह ब्लॉग नक्की फॉलो करा.
ADVERTISEMENT
Marathi News Live Update : शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत प्रवेश करणार आहेत असं म्हटलं जात आहे. बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. आढळराव पाटील यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. आज सकाळी 10 वाजता मुंबईत देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 07:52 PM • 23 Mar 2024
पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हा
बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आज त्या धाकटी पंढरीची क्षेत्र संस्था नारायण गड येथे दर्शनाला आले असता, गेवराई कडे मार्ग क्रमांक करताना बीड तालुक्यातील मौजे साक्षर पिंपरी येथे मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला. या दरम्यान आचारसंहिता आणि जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे जवळपास दहा मराठा आंदोलकांवरती बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे अशी फिर्याद पोलीस कर्मचारी यांनी दिली आहे. मात्र असे कितीही गुन्हे दाखल करा आम्हाला काही फरक पडत नाही अख्ख गाव पोलीस स्टेशनला जाऊन बसू असे मराठा बांधवांकडून सांगण्यात आले आहे.
- 05:36 PM • 23 Mar 2024
आताची मोठी बातमी! दिल्लीत महायुतीच्या जागावाटपावर आज अंतिम चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना होतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्यातील एनडीएच्या नेतृत्वाखालील मयुतीच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार आहे.
- 05:33 PM • 23 Mar 2024
आढळरावांच्या पक्ष प्रवेशावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न माझ्या मनात येतो.असा प्रश्न करत आढळराव यांना डॉ. अमोल कोल्हे यांनी टोला लगावलाय.
- 04:48 PM • 23 Mar 2024
प्रकाश आंबेडकरांनी दिला पाठिंबा, श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी मानले आभार
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं.
- 04:36 PM • 23 Mar 2024
'उदयनराजेंना उमेदवारी दिल्यास मविआ त्यांना बिनविरोध करणार का?', फडणवीसांचा सवाल
' जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण, २० टक्के काम बाकी आहे. उरलेल्या जागांचं वाटप लवकरच जाहीर करू. 3 पक्षात अंतिम जागा वाटप आहे, ते होईल. उदयनराजेंना उमेदवारी दिल्यास मविआ त्यांना बिनविरोध करणार का? आज उदयनराजेंची अमित शाहांसोबत बैठक होईल. अमित शाहांसोबत चर्चेनंतर साताऱ्याबाबत अंतिम निर्णय होईल. आंदोलनाच्या केसेस मागे घेणार, आम्ही त्यावर काम सुरू केलं आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही. तसंच मनसेला महायुतीत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- 04:19 PM • 23 Mar 2024
प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते आता काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. यातच आता प्रकाश आंबेडकरांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.
- 02:24 PM • 23 Mar 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. फडणवीस यांच्या दिल्लीत दोन ते तीन बैठका. काही राजकीय तर काही कौटुंबिक भेटी असल्याची माहिती. फडणवीस दुपारनंतर अमित शाह यांचीही घेणार भेट.
- 02:14 PM • 23 Mar 2024
भागवत कराडांची चंद्रकांत खैरेंवर जोरदार टीका
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना यावेळी आम्ही संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातुन हद्दपार करणार आहोत, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आता पुन्हा कधीही निवडून येणार नाहीत, चंद्रकांत खैरे हे दिवास्वप्न पाहत आहेत, खैरे हे आता कायमस्वरूपी माजी खासदार असणार आहेत, असे भागवत कराड यांनी म्हटले आहे.
- 02:12 PM • 23 Mar 2024
प्रकाश अण्णा शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली
प्रकाश अण्णा शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांची राजगृह येथे भेट घेतली आहे. ह्या निवडणुकीत तिसरी आघाडी होईल आणि राज्यात राजकीय भूकंप होईल अस भाकीत त्यांनी केल आहे
- 12:38 PM • 23 Mar 2024
'राज ठाकरे यांनी अजूनही माझ्यासाठी ते केल नाही..'- अमित ठाकरे
सध्या झी युवा वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित राज ठाकरे यांनी यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कारावर नाव कोरले आहे, रविवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ हा सोहळा प्रसारीत होणार आहे. झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केले.... आणि या वक्तव्यात त्यांनी राज ठाकरे यांनी अजूनही त्यांच्यासाठी काय केले नाही याची खंत व्यक्त केली. अर्थात अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क निर्माण झाले आहेत. "माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं."
- 12:33 PM • 23 Mar 2024
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आमदार लक्ष्मण पवार यांची घेतली भेट
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आगामी लोकसभेच्या निवडणुकीवरती चर्चा केली आहे. यावेळी समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते. पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसापासून दौऱ्यावरती आहेत त्यांच बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे ते आज गेवराई दौऱ्यावर ते असून त्यांनी गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांची भेट घेतली आहे.
- 11:27 AM • 23 Mar 2024
मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २४) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे.
- 11:25 AM • 23 Mar 2024
आपच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
सोलापुरातील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपचे शहराध्यक्ष निहाल किरनल्ली, युवा आघाडी अध्यक्ष निलेश संगेपागसह इतर 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना ईडीने अटक केल्यामुळे सोलापुरातील पूनम गेटवर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने आचारसंहिता लागू असताना जमावबंदीचा भंग केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. सदर बझार पोलीस ठाण्यात कलम 37 आणि 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT