गणपती बाप्पांच्या विलोभनीय मूर्ती, एकदा नक्की पाहा!
गणपती बाप्पाचं रुप हे खूपच विलोभनीय असतं. प्रत्येकाच्या मनात भरणारं हे रुप नेहमीच सकारात्मक उर्जा देतं. गणपती बाप्पांच्या सुंदर आणि अतिशय रेखीव मूर्ती या आपल्या प्रत्येकाला भुरळ घालतात. अशाच काही मूर्ती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यंदा गणेशोत्सवाची सुरुवात ही 10 सप्टेंबरपासून होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होईल. गणेशोत्सवातील […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गणपती बाप्पाचं रुप हे खूपच विलोभनीय असतं. प्रत्येकाच्या मनात भरणारं हे रुप नेहमीच सकारात्मक उर्जा देतं.
गणपती बाप्पांच्या सुंदर आणि अतिशय रेखीव मूर्ती या आपल्या प्रत्येकाला भुरळ घालतात. अशाच काही मूर्ती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
हे वाचलं का?
यंदा गणेशोत्सवाची सुरुवात ही 10 सप्टेंबरपासून होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होईल.
गणेशोत्सवातील हे दहाही दिवस सर्वत्र अतिशय आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण असतं.
ADVERTISEMENT
यंदाही कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावर काहीसे निर्बंध आहेत. मात्र, गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी आताही यथासांग तयारी करत आहे.
ADVERTISEMENT
गणेशोत्सव महाराष्ट्रात अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे.
गणेशोत्सवात पार्थिव गणेशाची घरोघरी पूजा केली जाते. अशावेळी सुंदर अशी बाप्पाची मूर्ती घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.
पार्थिव गणेश पूजनासाठी आता बाजारात अनेक मूर्ती उपलब्ध आहेत. त्यातील काही मूर्ती आम्ही आपल्याला दाखवत आहोत.
गणपती बाप्पा हे दैवत अगदी लहानग्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असाच आहे.
महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबई, पुणे आणि कोकणात गणेशोत्सवाचा प्रचंड जल्लोष असतो. मुंबईतील गणेशोत्सव हा येथील भव्यदिव्य मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील पेण येथील गणेशमूर्तींनी प्रचंड मागणी असते. येथील मूर्ती या फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जातात.
कोकणात देखील अत्यंत सुबक अशा गणेशमूर्ती हाताने घडवल्या जातात.
मुंबईत तर अत्यंत मोठ्या प्रमाणात गणपती कारखाने आहेत. जिथे वर्षभर मूर्ती घडवण्याचं काम सुरुच असतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT