सर्वाधिक बछड्यांना जन्म देणाऱ्या ‘सुपरमॉम’ कॉलरवाल्या वाघिणीचा मृत्यू
मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाल्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. 16 वर्षांच्या वाघिणीने पेंच व्याघ्र प्रकल्पात अखेरचा श्वास घेतला. सर्वाधिक बछड्यांना जन्म देणाचा रेकॉर्ड या वाघिणीच्या नावावर आहे. कॉलरवाली वाघीण (T-15) म्हणून ती ओळखली जात होती. आत्तापर्यंत तिने 29 बछड्यांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य हे नावलौकिक मिळवून देण्यात कॉलरवाल्या वाघिणीचा […]
ADVERTISEMENT
मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाल्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. 16 वर्षांच्या वाघिणीने पेंच व्याघ्र प्रकल्पात अखेरचा श्वास घेतला. सर्वाधिक बछड्यांना जन्म देणाचा रेकॉर्ड या वाघिणीच्या नावावर आहे. कॉलरवाली वाघीण (T-15) म्हणून ती ओळखली जात होती. आत्तापर्यंत तिने 29 बछड्यांना जन्म दिला आहे.
ADVERTISEMENT
मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य हे नावलौकिक मिळवून देण्यात कॉलरवाल्या वाघिणीचा मोठा हातभार राहिला आहे. तिचा जन्म सप्टेंबर 2005 मध्ये झाला. फक्त अ़डीच वर्षांची असताना तिने तीन बछड्यांना जन्म दिला. मात्र २४ तासातच त्यांचा मृत्यू झाला होता. 2008 ते 2013 या कालावधीत तिने 18 बछड्यांना जन्म दिला. ज्यातले 14 जिवंत राहिले. 2015 मध्ये तिने आणखी चार बछड्यांना जन्म दिला.
हे वाचलं का?
कॉलर लावण्यात आलेली ती दुसरी वाघिण होती. पिल्लांना जन्म देताना ती गुहेची निवड करत असे.
आतापर्यंत आठ वेळा तिने 29 बछड्यांना जन्म दिला आहे. 11 मार्च 2008 ला भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनमधल्या तज्ज्ञांनी या वाघिणीला रेडिओ कॉलर घातली होती. तेव्हापासून कॉलरवाली वाघीण म्हणून तिला ओळखलं जावू लागलं. पर्यंटकांना सर्वाधिक नजरेस पडणारी ती वाघिण होती. या कॉलरवाल्या वाघिणीवर टायगर स्पाय इन द जंगल हे डॉक्युमेंट्रीही तयार केली गेली आहे. पेंचची राणीही म्हणूनही ती प्रसिद्ध होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गेल्या काही आठवड्यांपासून कॉलरवाली वाघिण अशक्त झाली होती. पेंच व्याघ्र प्रकल्पात तिची देखभाल केली जात होती. तिला कुठल्याही प्रकारचा आजार किंवा इजा झालेली नव्हती. शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी सीताघाटजवळच्या भूरादत्त ओढ्याजवळ तिने अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT