Narayan Rane यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काय अटी-शर्थी ठेवल्या? जाणून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर अटकेची कारवाई झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महाड कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. रात्री पावणे दहा वाजता राणेंना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं. यावेळी सरकारी वकीलांनी राणेंनी ७ द़िवसांची पोलीस कोठडी मागितली होती. ही मागणी नामंजूर करत कोर्टाने राणेंना जामीन मंजूर केला.

ADVERTISEMENT

कोर्टान अनिकेत निकम आणि भाऊ साळुंखे यांनी राणेंची बाजू मांडली. नारायण राणेंना झालेली अटक ही बेकायदेशीर असून पोलिसांनी यात नियमांचं पालन केलेलं नसल्याचं निकम यांनी कोर्टासमोर सांगितलं. यानंतर कोर्टाने राणेंना वैय्यक्तित जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. परंतू हा जामीन मंजूर करताना महाड कोर्टाने काही महत्वाच्या अटी व शर्थी घातल्या आहे.

Breaking News : Narayan Rane यांना जामीन मंजूर, महाड कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

हे वाचलं का?

जाणून घेऊयात काय आहेत या अटी?

१) भविष्यात असा गुन्हा होणार नाही अशी लेखी हमी नारायण राणेंना द्यावी लागली आहे.

ADVERTISEMENT

२) जामीन मंजूर केल्यानंतर राणेंना दोन दिवस रायगड गुन्हे शाखेसमोर हजेरी लावावी लागणार आहे. ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर या दोन दिवसांना नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर रहावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

३) साक्षीदारांवर नारायण राणे कोणत्याही प्रकारात दबाव आणू शकणार नाहीत.

४) नारायण राणेंच्या आवाजाचे नमूने नारायण राणेंना पोलिसांना द्यावे लागणार आहेत. परंतू हे नमुने घेण्याआधी पोलीसांना राणेंना ७ दिवस आधी नोटीस द्यावी लागणार आहे.

दरम्यान कोर्टाने जामीन अर्ज मंजूरी केल्यानंतर नारायण राणेंनी सर्व कागदपत्रांची प्रक्रीया पूर्ण करत कोर्टातून बाहेर पडणं पसंत केलं. यावेळी नारायण राणेंची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी माध्यमांचा गराडा कोर्टासमोर होता. परंतू नारायण राणेंनी कोणालाही प्रतिक्रीया न देता बाहेर पडले. यानंतर नारायण राणे मुंबईतल्या आपल्या घरी जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

नारायण राणेंना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर जन आशिर्वाद यात्रेत एक ते दोन दिवसांचा खंड पडणार असून यानंतर भाजप पुन्हा एकदा आपल्या यात्रेला सुरुवात करेल अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी दिवसांमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT