Lockdown: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून करणार महत्त्वाची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे आजच जनतेशी संवाद साधणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले जाणार आहेत. नियमावलीही तयार करण्यात आली आहे. 15 दिवसांचा लॉकडाऊन उद्या रात्रीपासून लागण्याची शक्यता आहे. हा लॉकडाऊन उद्या मध्यरात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत असू शकतो.

ADVERTISEMENT

काय काय असू शकतात नियम वाचा सविस्तर

1) अत्यावश्यक सेवा सुरू राहतीलच म्हणजे

हे वाचलं का?

– वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स

– वृत्तपत्र, मीडीया संदर्भातील सेवा

ADVERTISEMENT

– दूध विक्री भाजीपाला विक्री, फळे विक्री, पेट्रोल पंप

ADVERTISEMENT

– किराणा दुकाने, अंडी आणि मास दुकाने, पशू खाद्य दुकाने

– बँक आणि पोस्ट सेवा

– कोरोना विषयक लसीकरण सेवा आणि चाचणी केंद्र, ऑप्टीकल्स दुकानं

अत्यावश्यक सेवेतील सर्वकाही सुरु राहणार.

2) फक्त अत्यावश्यक सेवेतील सर्वांसाठी वाहतूक सुरू राहण्याची शक्यता

रेल्वे, बस, एसटीचा वापर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी करू शकतील, त्याव्यतिरिक्त रस्त्यावर कोणालाही प्रवासाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता.

3) होम डिलिव्हरी सेवेवर भर दिला जाईल

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीची मुभा असेल. घरपोच मद्य सेवा सुरु ठेवली जाण्याची शक्यता आहे.

4) जिल्ह्यांतर्गत प्रवास बंद होण्याची शक्यता

Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या

5) विमान सेवा सुरूच राहण्याची शक्यता

मागच्यावेळी परदेशातून येणाऱ्यांमधून प्रामुख्याने कोरोनाचा प्रसार होत होता. पण आता मात्र तसं चित्रं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून इतर देशांत जाणाऱ्या विमानांवर बंदी घातली जाणार नाही, अशी शक्यता आहे. पण विदेशातून आणि इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना चाचणी अनिवार्य असेल. तसेच 7 ते 14 दिवासांचा क्वारंटाईन कालावधी कायम राहिल. तसेच इतर राज्यात किंवा परदेशात जायचं असेल तर इकडून सुद्धा चाचणी करूनच जावं लागण्याची शक्यता आहे.

6) वीकेंड लॉकडाऊनमध्ये ज्या प्रमाणे गॅरेज सर्विस,ट्रानस्पोर्ट वाहन दुरुस्ती सेवा, वाहनांचे स्पेअर पार्ट पुरवणारी दुकानं कोरोनाच्या नियमांचं पालन करून सुरु राहण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेऊन असेल.

7) एसी, कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद राहण्याची शक्यता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT