बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल; विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘ही’ चार नावं स्पर्धेत

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू असून, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले आहेत. बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. थोरात चार नावांबद्दल सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत.

ADVERTISEMENT

फेब्रुवारी २०२१ पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हिवाळी अधिवेशनातही अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न गेले गेले, मात्र राज्यपालांनी निवडणुकीला मंजुरी न दिल्यानं होऊ शकली नाही.

आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न केले जात असून, तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेऊन आले आहेत. गेल्या आठवड्यातच निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र, निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची योजना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मान्यता मिळाली नसल्याने प्रत्यक्षात येऊ शकली नाही.

हे वाचलं का?

आता या आठवड्यात निवडणुकीची शक्यता असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्ली गेले आहेत. बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून चार जणांची नावं विधानसभा अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आलेली आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेत असलेल्या बंद लिफ्यातील नावांमध्ये एकूण चार नावं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, बाळासाहेब थोरात घेऊन गेलेल्या चार जणांच्या यादीत त्यांचं नाव नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी चार नावं सुचवली आहेत. यामध्ये संग्राम धोपटे, सुरेश वरपुडकर, सुरेश धोटे, अमीन पटेल यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कोणत्या नावावर शिक्कामोर्तब केलं जातं, याकडे काँग्रेससह तिन्ही पक्षाचं लक्ष लागलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT