लाइव्ह

Manoj Jarange : ‘कुणाच्या आदेशावरून अधिकारी काम करतात’, जरांगेंचा बैठकीत सरकारला सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 09:22 PM • 02 Jan 2024

    मुख्यमंत्र्यांचा 6 जानेवारीपासून 48 लोकसभा मतदारसंघांचा दौरा-उदय सामंत

    महाराष्ट्रातील लोकसभेच्य 48 च्या 48 जागा जिंकण्याचा निर्धार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जानेवारीपासून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेणार आहेत. 7 रोजी राजापूरमधील या शिवसंकल्प अभियानाच्या बैठकीचे रूपांतर मोठ्या महासभेमध्ये होईल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची ही एक नांदी असणार असल्याचा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
  • 07:49 PM • 02 Jan 2024

    Maratha Reservation : जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही- शंभूराज देसाईंनी सरकारतर्फे दिला विश्वास

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नसून त्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. शंभूराज देसाई यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या सगेसोयरे शब्दाबाबत सरकारची तज्ज्ञ समिती अभ्यास करत मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 06:54 PM • 02 Jan 2024

    Manoj Jarange : कुणाच्या आदेशावरून अधिकारी काम करतात, जरांगेंचा बैठकीत सरकारला सवाल

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी कुणबी नोंदींची तपासणी करताना अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच कुणाच्या आदेशावरुन अधिकारी काम करत होते? असा सवाल जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही कामचुकार अधिकाऱ्यांनी नाव द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
  • 05:24 PM • 02 Jan 2024

    ठाकरेंच्या हाताला कारसेवकांच्या हत्येचं रक्त

    "संजय राऊतांचा राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंध नाही. उद्धव ठाकरे त्या आंदोलनात नव्हते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे. ज्या कोठारी बंधूंनी, कारसेवकांनी स्वतःचं बलिदान दिलं, त्यांचा खून मुलायमसिंगच्या समाजवादी पक्षाने केला. त्या समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंग यांच्याशी हातमिळवणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केली. त्यामुळे रामसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगले आहेत, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे उद्धवजींच्या कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागलं आहे", असं आशिष शेलार म्हणाले.
  • ADVERTISEMENT

  • 03:22 PM • 02 Jan 2024

    भारत न्याय यात्रेवरून काँग्रेसला भाजपचा सवाल

    राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत न्याय यात्रा सुरू होणार आहे. 14 जानेवारीपासून ही यात्रा सुरु होणार असून, तब्बल 14 राज्यातून ही यात्रा प्रवास करणार आहे. मणिपूरपासून मुंबईपर्यंत काढण्यात येणाऱ्या या यात्रेवरून भाजपने काँग्रेसला एक सवाल केला आहे.
  • 01:50 PM • 02 Jan 2024

    तुमचं वाटोळ झालं, तरी चालेल पण... -अरविंद सावंत

    ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, "स्वत:च्या ताटातलं अन्न खाणं प्रकृती, भुकेल्याला देणं ही संस्कृती; पण ताटच हिसकावुन घेणं ही विकृती! देशात केंद्रीय पातळीवर विकृती आहे... दुर्दैवाने पंतप्रधान म्हणतात गुजरात, सुरत पुढे गेला की देश पुढे जाईल. बाकीच्यांच काय? तुमचं वाटोळ झालं, तरी चालेल पण त्याचा धंदा व्हायला हवा कारण तो निधी देतो!!! हा लुटतो आणि त्यांना देतो", अशी घणाघाती टीका अरविंद सावंतांनी पंतप्रधान मोदींवर केली.
  • ADVERTISEMENT

  • 11:35 AM • 02 Jan 2024

    मोदी दक्षिण ध्रुवारूनही प्रचार करू शकतात -संजय राऊत

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिणेकडून करणार आहेत, याकडे माध्यमांच्या प्रतिनिधी खासदार संजय राऊतांचं लक्ष वेधलं. त्यावर ते म्हणाले, "हे बघा. ते पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे सगळे साधणं आहेत. दक्षिणेकडून काय... त्यांनी दक्षिण ध्रुवावरून केला किंवा चांद्रयान वर सोडलेलं आहे, तिथून जरी केला तरी त्यांना कोण अडवणार आहे? ते काहीही करू शकतात. अमर्याद सत्ता त्यांच्या हातात आहे. यंत्रणा आणि साधने आहेत. ते वर जे आपलं चांद्रयान गेलेले आहे किंवा दक्षिण ध्रुव आहे, तिथूनही प्रचार करू शकतात", असा टोला संजय राऊतांनी मोदींना लगावला.
  • 11:11 AM • 02 Jan 2024

    इंधन टंचाईची भीती, पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी, लागल्या लांब रांगा

    रस्ते अपघाताबाबत सरकारच्या कडक कायद्याच्या निषेधार्थ मालवाहन चालकांनी संप पुकारला आहे. यामध्ये मनमाडच्या पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकही सहभागी झाले आहेत. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील इंधन पंपावर दिसत आहेत.
  • 10:28 AM • 02 Jan 2024

    महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला? राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

    राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटप कसे करणार, या प्रश्नाभोवती सध्या चर्चेनं फेर धरला आहे. महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या असून, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाबद्दल आणखी माहिती दिली.
  • 10:02 AM • 02 Jan 2024

    मनोज जरांगेंना सरकारकडून निमंत्रण

    मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची सुरू असलेली कार्यवाही आणि आरक्षणाशी संबंधित इतर मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (2 जानेवारी) बैठक बोलावली आहे. 4 वाजता मुंबईत ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत भूमिका मांडावी, अशी विनंतीही सरकारने केली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी जरांगे यांना पत्र पाठवले आहे.
  • 09:54 AM • 02 Jan 2024

    हिट अ‍ॅण्ड रन विरोधात संतापाचा उद्रेक

    केंद्र सरकारने आणलेल्या 'हिट अ‍ॅण्ड रन' कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले. हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी मुंबई-महाराष्ट्र, इंदूर, दिल्ली-हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी ट्रकचालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत.
follow whatsapp

ADVERTISEMENT