लाइव्ह

Marathi News Live : “…या भ्रमातून भाजपने जागे व्हावे”, वडेट्टीवार का चिडले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 07:07 PM • 31 Dec 2023

    पोलिसांच्या गस्त पथकावर गोळीबार-9 गोळ्या झाडल्या

    अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिसांच्या गस्ती पथकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी फाट्यावर हा प्रकार घडला आहे. पोलीस पथक गस्त घालत असतांना पहाटे तीनच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला आहे. पथक गस्त घालत असताना मांजरी फाट्यावर दोन दुचाकीवरील लोकांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या होत्या. पोलीस पथकाने त्यांना हटवल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
  • 05:52 PM • 31 Dec 2023

    मोदी सरकार असा उल्लेख का?; वडेट्टीवार काय बोलले?

    "शासकीय यंत्रणा ही भारत सरकारची आहे, भाजप त्यांना स्वतःचे कर्मचारी म्हणून का राबवून घेत आहे? जनतेची कामे सोडून सत्ताधारी शासकिय यंत्रणा मोदींच्या प्रचारासाठी का वापरून घेत आहे? कार्यालयात येणाऱ्या जनतेची कामे कोण करणार? संविधानानुसार ‘भारत सरकार’ आहे. संकल्प यात्रा रथावर “मोदी सरकार” असा उल्लेख का?", असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
  • 04:31 PM • 31 Dec 2023

    सर्वज्ञानी संजय राऊत; चित्रा वाघ संतापल्या

    अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यावरून भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणालेले की, कार्यालयच अयोध्येत न्यावं. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, "तुमचं सरकार राज्यात असताना तुम्ही ते कुठून चालवलं, हे जनतेने पाहिलंय सर्वज्ञानी संजय राऊत. मुख्यमंत्र्याने मंत्रालयाचं तोंडही न पाहण्याचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विक्रम उद्धवजींच्या नावावर जमा आहे", असा टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला.
  • 03:33 PM • 31 Dec 2023

    महाराष्ट्रातील युवांच्या तोंडाचा घास पळवला जातोय -अनिल देशमुख

    अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा सिलसिला काही थांबायचं नावच घेत नाही असं दिसतंय. या आठवड्यात दोन मोठमोठे प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले आहेत. हे सगळे मोठे प्रकल्प गुजरातलाच का जातात हा महाराष्ट्रातील युवांना पडलेला प्रश्न आहे. गुणवत्ता असूनही महाराष्ट्रातील युवांच्या तोंडाचा घास पळवला जातोय पण सगळे गद्दार मूग गिळून गप्प बसलेत. यांचा मी धिक्कार करतो!"
  • ADVERTISEMENT

  • 03:18 PM • 31 Dec 2023

    मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

    छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, या मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
  • 03:16 PM • 31 Dec 2023

    इंडिया आघाडी जागावाटपावर भाजपची टीका, काय म्हटलंय?

    इंडिया आघाडीत जागावाटपावर मंथन सुरू आहे. महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत प्रादेशिक पक्षांनी मोठा वाटा मागितला आहे. त्यामुळेच जागावाटपाचा पेच वाढताना दिसत आहे. इंडिया आघाडीतील या गोंधळावर भाजपने भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने केलेल्या मागणीचा उल्लेख करत भाजपने इंडिया आघाडीत काहीही ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे. भाजपने नेमकं काय म्हटलंय पहा व्हिडीओ...
  • ADVERTISEMENT

  • 11:50 AM • 31 Dec 2023

    तुम्ही फक्त आमदार-खासदारांचे भाव वाढवले, दुसरं काय केलं? -संजय राऊत

    पुण्यात माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, जे आज मोदी मोदी करताहेत. मोदीमय झाले आहेत. कालपर्यंत हे दोन्ही लोक मोदींच्या धोरणावर विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भातील धोरणावर एकनाथ शिंदे, अजित पवार हे सातत्याने टीका करत होते. आज ते अचानक मोदी भक्त झाले", अशा शब्दात राऊतांनी सुनावलं.
  • 10:29 AM • 31 Dec 2023

    शरद पवार-प्रकाश आंबेडकरांची खरंच भेट झाली का?

    लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बेरजेचं राजकारण सुरू आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक आहेत. मात्र, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून याबद्दल कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
  • 10:13 AM • 31 Dec 2023

    भाजप, शिंदे सेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जागा निश्चित -फडणवीस

    भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, भाजपची व्होटबँक असलेल्या सर्वसामान्य आणि गरिबांशी संबंध घट्ट केले पाहिजे. या बैठकीत महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते.
  • 10:13 AM • 31 Dec 2023

    महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद

    उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीचा भाग होण्यास इच्छुक आहे. त्यासंदर्भात इंडिया आघाडी सकारात्मक असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT