Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी खरंच राष्ट्रध्वजाचा अवमान केला का? समजून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्र्यांनी नुकतंच महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं आणि त्यात अनलॉकिंग, कोविड, पूरस्थिती, आरक्षण विषयावर भाष्य केलं…पण याच भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा एक स्क्रीनशॉट व्हायरस होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्या मागे राष्ट्रध्वज तर होताच शिवाय एक भगवा झेंडाही होता….तिरंग्यासोबत दुसरा झेंडा फडकावणं तो ही तिरंग्याहून उंच हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय…त्यामुळे खरोखरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे का? काय केलं की राष्ट्रध्वजाचा अवमान ठरतो हेच आज जाणून घेऊयात…

ADVERTISEMENT

आपल्या राष्ट्रध्वजासंबंधी जे काही नियम आहेत ते सगळे इंडियन फ्लॅग कोड मध्ये नमूद करण्यात आले आहेत…2002 मध्ये हा कोड लागू करण्यात आला होता.

त्यात असंख्या नियम आहेत, पण सुरूवातीला आपण मुख्यमंत्र्यांसंदर्भात जी पोस्ट फिरतेय, त्यासंबंधीचे नियम समजून घेऊ. तर जसं या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय, तसं तिरंग्याहून उंच एक झेंडा लावण्यात आला आहे. हे नियमात बसत नाही. इंडियन फ्लॅग कोडनुसार तिरंग्याच्या वर म्हणजे उंचीने कुठलाही झेंडा असता कामा नये.

हे वाचलं का?

शिवाय इंडियन फ्लॅग कोडच्या सेक्शन 3 मधील 3.9 पार्टमध्ये सांगण्यात आलं आहे की राष्ट्रध्वज हा कायम बोलणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या बाजूलाच असायला हवा. डाव्या बाजूला असता कामा नये. म्हणजे पाहणाऱ्याच्या नजरेत ही बाजू डावी असते. पण जी व्यक्ती बोलते तिच्या उजव्या बाजूला तिरंगा असावा. पण मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात तिरंगा हा डाव्या बाजूला लावण्यात आलेला.

ADVERTISEMENT

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या संवादात राष्ट्रध्वजासंबंधी 2 नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. एक की झेंड्याच्या बाजुला असलेला दुसरा झेंडा हा तिरंग्यापेक्षा उंच होता. आणि दुसऱ्या नियमाचं उल्लंघन म्हणजे राष्ट्रध्वज डाव्या बाजूला ठेवणं.

ADVERTISEMENT

अडव्होकेट असिम सरोदे यांनी हे मुद्दे पकडत फेसबूक पोस्ट टाकलेली त्यांची प्रतिक्रियादेखील आम्ही जाणून घेतली.

सरोदे यांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीनुसार त्यांना शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे तिरंग्याचा अवमान करणं हा आमचा उद्देश नव्हता, जे काही झालं ते अनावधानानं झालं आहे, पुढच्या वेळी काळजी घेण्यात येईल.

अॉड. असिम सरोदे, मुंबई हायकोर्ट

Governor Vs Uddhav Thackeray : राज्यपालांकडे कायद्याने कोणते अधिकार? समजून घ्या

इंडियन फ्लॅग कोडचं उल्लंघन केल्यास 3 वर्षांचा तुरूंगवास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

याशिवाय इंडियन फ्लॅग कोडनुसार आणखीही काही बेसिक नियम आहेत, जसं की तिरंग्यानुसार केशरी रंग हा कायमच वर असला पाहिजे, त्यानंतर पाढरा आणि मग हिरवा आणि मध्ये अशोक चक्र. झेंड्याची ही रूपरेषा बदलणं कायद्याने गुन्हा आहे. झेंडा हा कपड्याचा किंवा सिल्कचा असला पाहिजे. झेंडा हा कायम सुर्योदयाला फडकावण्यात यावा आणि सुर्यास्ताला तो उतरावा. सूर्यास्तानंतर झेंडा फडकावण्याला मान्यता नाहीये.

झेंडा हा खाजगी कारवर लावायलाही परवानगी नाही आहे. राष्ट्रपती-उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्याचे मंत्री, मुख्य न्यायाधीश, सुप्रीम कोर्ट-उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सैन्य दलाचे अधिकारी यांनाच आपल्या कारवर राष्ट्रध्वज लावायला परवानगी आहे. खासदार-आमदारांनाही खरतर तिरंगा आपल्या कारवर लावायला परवानगी नाहीये.

जेव्हा दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती-पंतप्रधान आपल्या देशात येतात, तेव्हाही कारवर किंवा टेबलवर उजव्या बाजूलाच आपला राष्ट्रध्वज ठेवला जातो. दुसऱ्या देशाचा राष्ट्रध्वज हा कायम डाव्या बाजूला लावण्यात येतो.

Caste Census : जातिनिहाय जनगणना आणि इम्पिरीकल डेटा म्हणजे काय? समजून घ्या

राष्ट्रध्वजाला आपण सलाम ठोकणं अपेक्षित असतं, कुणाचा तरी सन्मान करण्यासाठी किंवा सलाम करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करता येत नाही. राष्ट्रध्वज हे आपल्या देशाच्या प्रतिकापैकीच एक आहे. त्यामुळे त्याच्याहून मोठी देशातली कुठलीही व्यक्ती नाही.

शिवाय राष्ट्रध्वज कशाच्याही भोवती गुंडाळण्यालाही परवानगी नाहीये. केवळ जवान शहीद होतात त्यांनाच तिरंग्यात लपेटलं जातं…त्याव्यतिरिक्त आपला देशाचा झेंडा कशातही गुंडाळला जात नाही. शिवाय झेंडा जमीनीला लागता कामा नये, राष्ट्रध्वज जमिनीला तर लागत नाहीयेना, त्याच्यावर पाणी लागत नाहीयेना, तो फाटला नाहीयेना हे सगळं पाहणं आपलं कर्तव्य असतं.

राष्ट्रध्वजाचा कर्मशिअली वापरही करता येत नाही. म्हणजेच कुठलाही ब्रँड तिरंगा वापरू शकत नाही, ब्रँड्समध्ये राष्ट्रध्वजाचा वापरत करया येत नाही. व्यवसाय करण्याच्या हेतूने राष्ट्रध्वजाचा वापर करता येत नाही.

राष्ट्रध्वज शर्ट-टॉपवर प्रिंट होऊ शकतो, पण त्यातही तो कंबरेच्या वर प्रिंट करायलाच परवानगी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT