देशातील 13 राज्यांमधील मुख्यमंत्र्यांमध्ये CM Uddhav Thackeray नंबर वन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रश्नम या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच 13 राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत नंबर वन मुख्यमंत्री ठरले आहेत. कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य चांगल्या प्रकारे चालवल्याचं मत नोंदवत देशातल्या नागरिकांनी क्रमांक एकचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पसंती दर्शवली आहे. देशाची 67 टक्के लोकसंख्या असलेल्या 13 राज्यांमधील सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे क्रमांक एकचे मुख्यमंत्री ठरले आहेत.

ADVERTISEMENT

प्रश्नमच्या सर्वेक्षणात 3 पर्याय

प्रश्नमने घेतलेल्या सर्वेक्षणात 13 राज्यात मिळून एकूण 17 हजार 500 जणांनी आपलं मत नोंदवलं. महत्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी एक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात 3 पर्याय देण्यात आले होते.

हे वाचलं का?

1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको

2. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही

ADVERTISEMENT

3. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना 49 टक्के मतं

या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.

उत्तराखंड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबाबत नकारात्मक मत

दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत मात्र नकारात्मक मतं मोठ्या प्रमाणात नोंदली गेली आहे. 60 टक्के मतदारांनी अमरिंदर सिंग यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलंय. तर केवळ 15 टक्के लोकांनीच त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांच्याबाबत सर्वाधिक नकारात्मक मतं नोंदवण्यात आली आहेत. त्यानंतर पंजाब आणि गुजरातचा समावेश क्रमांक लागला आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवराज चौहान हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, तर उत्तराखंडचे तीन मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंह हे लोकप्रिय नाहीत. यामध्ये गुजरातमध्ये विजय रुपाणी दहाव्या क्रमांकावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाचवे सर्वात स्थानावर आहेत. पुढच्या वर्षी उत्तराखंड, पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT