महाराष्ट्रात दिवसभरात 15 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 53 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 15 हजार 277 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण 59 लाख 27 हजार 756 रूग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.15 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 7 हजार 603 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 53 मृत्यूंची […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 15 हजार 277 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण 59 लाख 27 हजार 756 रूग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.15 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 7 हजार 603 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 53 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.04 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 41 लाख 86 हजार 449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 65 हजार 402 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 476 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर राज्यात 4 हजार 654 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 8 हजार 343 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात 7 हजार 603 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 61 लाख 65 हजार 402 इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 53 मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 11 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 93 ने वाढली आहे. हे 92 मृत्यू, चंद्रपूर-15, रायगड-13, पुणे-12, कोल्हापूर-11, सांगली-8, सातारा-7, अमरावती-6, अहमदनगर-5, नागपूर-3, पालघर-3, रत्नागिरी-3, सिंधुदुर्ग-2, ठाणे-2, वर्धा-2 आणि अकोला-1 असे आहेत असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातले 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे
मुंबई – 11 हजार 106
ADVERTISEMENT
ठाणे- 16 हजार 488
ADVERTISEMENT
पुणे- 16 हजार 925
सांगली- 11 हजार 72
कोल्हापूर- 11 हजार 794
महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण सक्रिय आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT