महाराष्ट्रात दिवसभरात 40 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 92 टक्के

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 40 हजार 294 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 51 लाख 11 हजार 95 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 92.4 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 26 हजार 133 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात 682 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57 टक्के इतका आहे.

ADVERTISEMENT

आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 27 लाख 23 हजार 361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55 लाख 53 हजार 225 नमुन पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 लाख 55 हजार 729 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 22 हजार 103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 3 लाख 52 हजार 247 सक्रिय रूग्ण आहेत.

हे वाचलं का?

आज राज्यात 26 हजार 133 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 55 लाख 53 हजार 225 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 682 मृत्यूंपैकी 392 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत, तर 290 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Tauktae Cyclone : गोरेगावमध्ये कोव्हिड सेंटरची वाताहत

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

मुंबई- 28 हजार 232

ठाणे- 25 हजार 337

पुणे- 54 हजार 198

सातारा- 17 हजार 696

सांगली- 17 हजार 918

कोल्हापूर- 13 हजार 701

सोलापूर- 18 हजार 95

नाशिक- 16 हजार 240

अहमदनगर- 17 हजार 755

नागपूर – 18 हजार 482

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT