मध्यरात्री मोठा निर्णय, Crime Branch मधील 65 जणांसह मुंबईतील 86 पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या
मुंबई: मुंबईत पोलीस दलाशी निगडीत अनेक गोष्टी मागील काही दिवसांपासून घडत आहे. अशावेळी काल (23 मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे मुंबईच्या पोलीस दलातील PI, PSI, API पदावरील तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ज्यापैकी 65 अधिकारी हे क्राईम ब्रांचमधील आहेत. अचानक करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे पोलीस दलात ‘मिशन […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबईत पोलीस दलाशी निगडीत अनेक गोष्टी मागील काही दिवसांपासून घडत आहे. अशावेळी काल (23 मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे मुंबईच्या पोलीस दलातील PI, PSI, API पदावरील तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ज्यापैकी 65 अधिकारी हे क्राईम ब्रांचमधील आहेत. अचानक करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे पोलीस दलात ‘मिशन क्लीन अप’ तर करण्यात आलेलं नाही ना? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. (maharashtra government transfers 86 police personnel including 65 from mumbai police crime branch)
ADVERTISEMENT
आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तात्काळ या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची आणि अधोरेखित करणारी बाब म्हणजे क्राईम ब्रांचमधील तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या या इतर ठिकाणी करण्या आल्या आहेत.
अँटेलिया संशयित कार प्रकरण, मनसुख हिरेन हत्या या सगळ्या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या कारभारावर बरेच ताशेरे ओढले गेले आहेत. त्यातही एपीआय सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक झाल्यानंतर क्राईम ब्रांचची प्रतिमा अजूनच डागाळली आहे. अशावेळी पुन्हा एकदा क्राईम ब्रांच आणि मुंबई पोलीस दलाला आपली प्रतिमा उंचावण्यासाठी या बदल्या करण्यात आल्या असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
हे वाचलं का?
पाहा कोण-कोणत्या अधिकाऱ्यांची करण्यात आलीए बदली
मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?
ADVERTISEMENT
सचिन वाझेंचे निकटवर्तीय रियाझ काझींची देखील बदली
ADVERTISEMENT
वाझेंना करण्यात आलेल्या अटकेनंतर क्राईम ब्रांचमधील 28 पोलीस निरिक्षक, 17 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 20 पोलीस उप निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्राईम ब्रांचच्या इंटेलिजन्स युनिटचे अधिकारी आणि सचिन वाझे यांच्या अगदी जवळचे समजले जाणारे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आता सशस्त्र पोलीस दल विभागात करण्यात आली आहेत.
अँटेलियाप्रकरणी वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर रियाझ काझी यांची देखील NIA कडून तब्बल 9 तास चौकशी देखील करण्यात आली होती. काझी यांनीच वाझे यांच्या साकेत सोसायटीमधून सीसीटीव्ही फुटेज आणि DVR ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात काझींबाबत देखील काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण त्यांना देखील भोवलं असून त्यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आली आहे.
सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या, विश्वासू सहकारी रियाझ काझी माफीचा साक्षीदार होणार?
मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचं आव्हान-हेमंत नगराळे
‘मुंबई पोलीस खातं सध्या कठीण समस्येतून जातं आहे. ही कठीण समस्या सोडवण्यासाठीच माझी नियुक्ती करण्यात आली आहे. या समस्येमुळे मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतरच मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न मी करेन आणि मुंबई शहरात अधिकारी, कर्मचारी ते कॉन्स्टेबल दर्जापर्यत सगळ्यांचं सहकार्य मला हवं आहे. हे सहकार्य मला मिळेल याची खात्री आहे.’ असं हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर म्हटलं होतं.
‘मागच्या काही दिवसांपासून जे काही आपण पाहतो आहे. पोलीस अधिकाऱ्याची अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग योग्य नाही. NIA आणि ATS या दोन्ही संस्थांकडे तपास सोपवण्यात आला आहे. योग्य तो तपास झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’ असंही नगराळे यांनी स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT