Maharashtra@61 : इतक्या वर्षात महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला -डॉ. अभय बंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharshtra@61 महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली तेव्हा मी 10 वर्षांचा होतो. महाराष्ट्र राज्याने 61 वर्षे पूर्ण केली आहेत या 61 वर्षात अनेक बदल घडले आहे. मागच्या 61 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. महाराष्ट्राचा आर्थिक विकास झाला, शैक्षणिक विकास झाला, रस्त्यांचाही विकास झाला. राजकीय पक्ष बदलले. त्या काळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते होते. आज त्यांचे वारसदार शरद पवार आहेत. तेव्हा बाळ ठाकरेंचा नुकताच उदय होत होता. आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र दिनी 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू व्हावं ही मुख्यमंत्र्यांची इच्छा..’

महाराष्ट्राचा राजकीय चेहराही गेल्या काही वर्षांमध्ये बदलला. महाराष्ट्रात अनेक चळवळीही उदयास आल्या, शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस अशी काही नावं त्यासाठी घेता येतील. स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या चळवळीही महाराष्ट्राने पाहिल्या. या साठ वर्षांमध्ये महाराष्ट्र खूप बदलला, खूप विकास झाला. त्या काळात पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत होते. आता त्यांना वाचण्यासाठी लायब्ररीत जावं लागतं. लता मंगेशकर आणि आशा भोसले या गात होत्या, त्यांच्या आवाजाशिवाय मी महाराष्ट्राची कल्पना करूच शकत नाही.

हे वाचलं का?

गेल्या ६१ वर्षात महाराष्ट्रात जरी अनेक चांगले बदल झाले असले तरीही काही नकारात्मक गोष्टीही राहिल्या. मुंबईचं उत्पन्न आणि गडचिरोलीतलं उत्पन्न यामध्ये अजूनही खूप फरक आहे. कुपोषणाचा प्रश्न अद्यापही आहे, कुपोषण 33 टक्क्यांपर्यंत कायम आहे. आरोग्याचे जुने प्रश्न जसे की मलेरिया, धनुर्वात, घटसर्प हे बऱ्याच प्रमाणात कमी झाले. पण ब्लड प्रेशर, लकवा, हृदयरोग, कॅन्सर, मानसिक रोग असे नवे प्रश्नही महाराष्ट्रासमोर निर्माण झालेले आपण पाहिले.

कोरोनाच्या संकटाने आपल्या आरोग्यातील एक मोठी उणीव उघडी पाडली असं म्हणता येईल. कारण आपण हॉस्पिटल्स निर्माण केले, डॉक्टर्सही निर्माण केले. पण आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण करू शकलो नाही. रोग नियंत्रणाची पुरेशी व्यवस्था निर्माण केली नाही. त्यामुळेच आज आपण एका मोठ्या संकटातून जातो आहोत. महाराष्ट्राची विचारी जनता आणि प्रगल्भ नेतृत्व हे संकटही ओलांडून पुढे जाईल अशी मला खात्री वाटते. आजपर्यंत जी प्रगतीसाठी महाराष्ट्राचं अभिनंदन आणि पुढच्या उज्ज्वल काळासाठी महाराष्ट्राला शुभेच्छा!

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT