महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? राजेश टोपे करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई, नागपूर आणि पुणे या तिन्ही शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन करावा लागेल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

लॉकडाऊनच्या संदर्भात आम्ही काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आज रात्री याबद्दल चर्चा केली. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर काही शहरांमध्ये लॉतकडाऊन करावाच लागेल असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. तसंच गरज पडल्यास राज्यातही लॉकडाऊन करावं लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुंबईकरांनो ‘या’ ठिकाणांवर तुमची अचानक कोरोना टेस्ट होणार, खर्चही तुमच्याकडूनच !

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या जंबो सेंटर्सना कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. ज्या ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत त्या तातडीने करायच्या आहेत असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती. पण आता ती परिस्थिती नाही.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या काही आरोग्य सुविधा असतील त्याबद्दल आम्ही सज्ज असणार आहोत. लसीकरणही लवकरात लवकर करण्याची आवश्यकता आहे. आज पर्यंत ४५ लाख जणांना लस देण्यात आली आहे अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतल्या खासगी रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रांविषयी मोठा निर्णय

ADVERTISEMENT

मधल्या काळात लसी पडून आहेत असं केंद्रातर्फे सांगण्यात आलं मात्र रोज तीन लाख लसी दिल्या जात आहेत. ग्रामीण भागांमध्ये उप केंद्रांपर्यंत लसीकरण पोहचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. खासगी रूग्णालयांना मी स्वतः भेटून सांगितलं की कोल्ड चेन उपलब्ध असतील तर त्यांना लसीकरणाचे अधिकार द्या. त्यानुसार २० बेडचं रूग्णालय असेल तरीही लसीकरणाची व्यवस्था होईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पुढील तीन महिन्यात लसीकरण संपवण्याचं आमचं लक्ष्य आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT