कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये हीच शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची इच्छा- राजेश टोपे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शरद पवार साहेबांच्या आवाहनानंतर अनेक साखर कारखाने, ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येत आहे. आपल राज्य स्वतः आत्मनिर्भर व्हावं, स्वतः च्या पायावर आपण उभे राहावे. इतर राज्यापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये. मुख्यमंत्री आणि पवारसाहेब यांची इच्छा आहे. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

रेशनकार्ड केशरी असो की पांढरं… Mucormycosis च्या रुग्णाचा सर्व खर्च सरकार करणार: राजेश टोपे

आशा वर्कर बाबत माझी युनियन सोबत सविस्तर चर्चा झाली आहे. तिसर्‍या लाटेच्या उंबरठयार आहे. त्यामुळे ते आंदोलन करणार नाही. तरी देखील ते आंदोलन करणार असतील, तर ते चुकीचे आहे.आशा वर्कर बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांनी आंदोलनाचं शस्त्र उपसू नये ही आमची इच्छा आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

जोवर केंद्राच्या कायद्यात बदल होत नाही. तो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही आणि तो त्यांनी बदल करावा. आपण तो बदल स्वीकारणार आहोत, त्याच बरोबर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र ओबीसी समजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे. हीच अपेक्षा महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही – संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा

ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले असले तरीही सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे 5 टक्के पेक्षा जास्त दर आहे. त्या ठिकाणी आमचं लक्ष असून लवकरच तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करत आहोत असंही राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितलं.

ADVERTISEMENT

लसीकरणाबाबत ते म्हणाले की केंद्र सरकारने अधिकाधिक लस पुरवठा करावा. महाराष्ट्राने आत्तापर्यंत 3 कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. अद्यापपर्यंत आपल्याला 13 कोटी लसीकरण करणे बाकी आहे. उर्वरित लसीकरण देखील 3 ते 4 महिन्यात पूर्ण करू, मात्र आपल्याला केंद्र सरकारने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे हेदेखील राजेश टोपे यांनी बोलून दाखवलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT