महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांची भेट घेणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची भेट ठरणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटेलिया स्कॉर्पिओ प्रकरण समोर आणत सचिन वाझेंवर आरोप केले. सचिन वाझेंची आधी बदली आणि नंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. १३ मार्चला सचिन वाझेंना एनआयएने अटकही केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांची आज होणारी शरद पवारांसोबतची भेट ही महत्त्वाची मानली जाते आहे.

मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

हे वाचलं का?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी २५ फेब्रुवारीला अँटेलिया बाहेर आढळून आलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण चर्चेत आणलं. अँटेलियाबाहेर जेव्हा जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ आढळून आली तेव्हा ती बाब समजताच तिथे सचिन वाझे कसे काय हजर झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच कारचे मालक मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे व्यावसायिक संबंध कसे आहेत ते देखील सभागृहासमोर मांडलं. मनसुख हिरेन यांना सुरक्षा देण्याची गरज आहे अशी मागणी ५ मार्चला देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली त्यानंतर त्याच दिवशी दोन तासांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला.

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी जो जबाब नोंदवला त्यातला काही भागही त्यांनी वाचून दाखवला. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनी केल्याचा संशय या जबाबात विमला हिरेन यांनी व्यक्त केला. हाच आधार घेत सचिन वाझेंना अटक का केली नाही? असाही प्रश्न विचारण्यात आला. सचिन वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत आहेत असाही आरोप झाला. तसंच अनिल देशमुख यांना या सगळ्या प्रकरणातले बारकावे का ठाऊक नाहीत असाही प्रश्न उपस्थित केला.

ADVERTISEMENT

सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस

ADVERTISEMENT

अँटेलिया स्कॉर्पिओ प्रकरण हे NIA कडे सोपवण्यात आलं तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलं. NIA ने १३ मार्चला सचिन वाझेंना अटक केली. तसंच या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही राजीनामा १७ मार्चला घेण्यात आला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गृह खातं हे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यामुळेच आज शरद पवार यांच्या भेटीला अनिल देशमुख पोहचले आहेत. या दोघांमध्ये काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT