Maharashtra HSC Result 2021 Online: 12वीचा निकाल मोबाइल आणि mahresults.nic.in वेबसाइटवर कसा पाहता येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

HSC Result 2021 Online and Offline: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board HSC Result 2021) MSBSHSE बारावीचा निकाल निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे महाराष्ट्र सरकारने बारावीची परीक्षाच रद्द केली होती. अशावेळी निकाल कसा लावला जाणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यंदाचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळत आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइनच पाहता येईल. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल जाहीर केला जातो. त्याचप्रमाणे यंदा देखील जाहीर केला जाईल.

हे वाचलं का?

महाराष्ट्र बारावी बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द केल्याने निकाल नेमका कसा लागणार याचीच चिंता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागून राहिलेली आहे. यंदा निकालासाठी अंतर्गत मूल्यमापन ही नवी पद्धत अंमलात आणली गेली आहे. दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर होत असतो. मात्र मागील दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे निकाल जाहीर करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडत आहे.

दरम्यान, यंदाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पाहा बारावीचा निकाल आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजेच मोबाइलवर कसा पाहू शकता.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र बारावी निकाल 2021 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?

ADVERTISEMENT

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने HSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर होईल.

  • HSC Result 2021 – निकाल नेमका कसा पाहाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.

  • नेमका निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर M876544 असेल आणि तुमच्या आईचे नाव अनिता असं असेल तर तुम्ही M876544 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANI असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल आपल्यासमोर काही क्षणात दिसू लागेल.

  • Maharashtra HSC Result 2021:’MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

    महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021: मोबाइलवरुन कसा पाहाल निकाल?

    बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या मोबाइलवरुन ऑफलाइन पद्धतीने बारावीचा निकाल पाहता येईल. अनेक वेळेस निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतेक वेबसाइट या क्रॅश होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.

    SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC ” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या माध्यमातून दिसेल.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT