लाइव्ह

Maharashtra Breaking news live : “…तेव्हा महाविकास आघाडीचे नेते झोपी गेले होते का?”

मुंबई तक

ADVERTISEMENT

MLA disqualification case hearing updates, maharashtra Latest news, Maratha Reservation, manoj jarange vs chhagan bhujbal
MLA disqualification case hearing updates, maharashtra Latest news, Maratha Reservation, manoj jarange vs chhagan bhujbal
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 11:22 AM • 30 Nov 2023

    राज्यात अवकाळी, संजय राऊत शिंदे-फडणवीसांना म्हणाले \\\\\\\'सुलतान\\\\\\\'

    राज्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे बाहेर राज्यातील प्रचारात व्यस्त असल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवत खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांवर तोफ डागली. "राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरु आहे. राज्यातील सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग आहे. इकडून तिकडे खोके पोहोचवणं हेच या सुलतानाचं काम आहे", असं राऊत म्हणाले.
  • 10:31 AM • 30 Nov 2023

    Maratha Reservation :

    राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये पाठिंबा काढल्यामुळे सरकार पडले. सरकार पडले नसते, तर पुढच्या वेळी आमचं सरकार येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीच काम केलं नाही, आणि विचार सुद्धा केला नाही. मराठा आरक्षणाची केस जेव्हा सुप्रीम कोर्टात होती, तेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झोपी गेले होते. महाविकास आघाडीचे सर्व नेते झोपी गेले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस आहेत, मात्र जे आरक्षण द्यायचं होतं ते तुम्ही घालवले", अशी टीका बावनकुळे यांनी केली.
follow whatsapp

ADVERTISEMENT