विधान परिषद निवडणूक : नागपूर, अकोल्यात भाजपने उधळला गुलाल; शिवसेनेला मोठा धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्यानंतर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दोन्हा जागांवरील निकाल लागले असून, नागपूर, अकोल्यात भाजपनं विजयाचा गुलाल उधळला आहे. तर अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले आहेत. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली, तर काँग्रेसने समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळाली. काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले छोटू भोयर यांना 1 मत मिळालं. तर 5 मते अवैध ठरली.

नागपूर मतदारसंघात भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना मैदानात उतरवलं होतं. तर मूळचे भाजपमधून आलेल्या नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपची नगरसेवक सहलीवर पाठवण्याची योजना यशस्वी ठरली असून, भाजपने बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला आहे.

हे वाचलं का?

या विजयानंतर भाजपचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ‘काँग्रेसला जी 186 मतं मिळाली आहेत. जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली नसती, तर 186 मतेही मिळाली नसती. राष्ट्रवादी-शिवसेना पाठिशी उभी राहिल्याने मतं मिळाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन मंत्र्यांच्या दबावाखाली आहे. यामुळे कांग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. छोटू भोयर यांनीही स्वतःला मतदान केलं. त्यांनीही काँग्रेसला मतदान केलं नाही. हा नाना पटोलेंचा पराभव असून, त्यांनी प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला पाहिजे’, असं बावनकुळे म्हणाले.

अकोल्यात भाजपच्या खंडेवालांनी मारली बाजी

ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अकोल्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. यात भाजपच्या वंसत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांना पराभूत केले. वसंत खंडेलवाल यांना 438, तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मतं मिळाली आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया मागील तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. यापूर्वी शिवसेना-भाजप यांची युती असल्यानं भाजपला या जागेवर निवडणूक लढवता आली नव्हती. आता अखेर 18 वर्षानंतर भाजपने शिवसेनेचा पराभव करत विजय मिळवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT