लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह पेटीशनवरील सुनावणी पूर्ण, आता निकालाची प्रतीक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Breaking News Live 05 December 2023 news
Maharashtra Breaking News Live 05 December 2023 news
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 10:18 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची घरवापसी, ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

    मागील महिन्यात शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात दाखल झालेले भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी पुन्हा शिंदे गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. संतोष कदम आणि प्राची कदम यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जात त्यांनी शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
  • 09:38 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : जहाल माओवाद्याला अटक, इंद्रावती नदीजवळ केली अटक

    छत्तीसगड जिल्ह्यातील चेरपल्लीमधील जहाल माओवादी नामे महेंन्द्र किष्ट्य्या वेलादी याला इंद्रावती नदीजवळ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या हालचाली माओवाद्यांना पुरवण्यासाठी तिथे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सीआरपीएफकडून त्याला ताब्यात घेतले आहे.
  • 09:08 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : माहूरमध्ये मराठा-ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने, दुग्धाभिषेक घालून कृतीचा निषेध

    माहूरमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवेळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी गोमूत्र टाकून शुद्धीकरण केले तर मराठा आंदोलकांनी दुग्धाभिषेक करत या कृतीचा निषेध केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी कार्यकर्त्यांनी काळ झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना काळे झेंडे दाखवता आलं नाहीत.
  • 08:20 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीची पुरातन दागिने गायब, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

    धाराशिव: तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गायब झाल्या प्रकरणी 4 ते 5 दिवसात आता गुन्हा नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली आहे. दागिने गहाळ प्रकरणी संबंधित महंत, पुजारी, धार्मिक व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार असून विधी विभागाचा कायदेशीर सल्ला मागितला असल्याचेही सांगण्यात आले आहे. पाऊण किलोपेक्षाही जास्त सोन्याच्या वजनाचा मुकुट गायब झाला असून इतर दागिनेही गायब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
  • ADVERTISEMENT

  • 07:34 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : अवसान गळालेला विरोधी पक्ष, CM शिंदेंचा विरोधकांवर पलटवार

    राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पत्र दिलं आहे, मात्र त्यामध्येही त्यांची एकवाक्यता दिसून येत नसल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. जे पत्र दिले आहे, त्यामध्ये 23 जणांची नावं आहेत मात्र नाव फक्त 7 जणांची असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. त्यातच आता राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या विधानसभेचा निकाल लागल्यामुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीकीही त्यांनी केली आहे.
  • 06:52 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : सरकारने राज्याला आर्थिक शिस्त लावली, अजित पवारांनी विरोधकांना फटकारले

    विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर अनेक आरोप करत त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. मात्र टीका करताना तरी तुम्ही त्या योग्य पद्धतीने करा असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर लगावला आहे. मात्र विरोधकांनी टीका केली असली तरी सकारात्मकतेने पुढं जाण्यासाठी आमचा सत्तारूढ पक्ष तयार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील विदर्भासह सगळ्या शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
  • ADVERTISEMENT

  • 06:32 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update :ज्यांनी नागपुरात कधी अधिवेशनच घेतलं नाही, तेच टीका करतात; फडणवीसांची विरोधकांवर टीका

    देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संतुलित आहे. विरोधी पक्षाकडून अधिवेशन फक्त 10 दिवस चालणार म्हणून टीका केली जात आहे. मात्र ज्यांनी नागपूरात कधी अधिवेशनच घेतले नाही, तिच माणसं आज आमच्या टीका करत असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आधी स्वतः आरश्यात पहिल्यांदा पाहिले पाहिजे नंतर टीका केली पाहिजे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
  • 06:13 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : राज्यातील प्रश्नांपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न; विजय वडेट्टिवार यांचा घणाघात

    राज्यातील प्रश्नांवर चर्चा टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान 15 दिवसाचा असावा अशी मागणी केली असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांमुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही विरोधकांनी सांगितले.
  • 05:44 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : मराठा समाजाच्या पाठीत ठाकरेंनी खंजीर खुपसला, बावनकुळेंचा पलटवार

    मराठा आरक्षणाची मारेकरी जे सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. साधा वकील देऊ शकले नाहीत, त्यांनी काळे झेंडे दाखवावे असा संतप्त सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असल्याचे सांगत मराठा आरक्षण जाण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असून त्यांनीच मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तुळजापुरात केले.
  • 05:11 PM • 06 Dec 2023

    Manoj Jarange : मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी;जरांगे पाटलांचे रेणुका मातेला साकडे

    मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी असे साकडे मनोज जरांगे पाटील यांनी रेणुका माते कडे केली आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने कुणबींच्या नोंदी घ्याव्यात आणि मराठा आरक्षणाचा निकाल तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी केली.
  • 04:09 PM • 06 Dec 2023

    Maratha Reservation : क्युरेटिव्ह पेटीशनवरील सुनावणी पूर्ण, आता निकालाची प्रतीक्षा

    मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पेटीशनवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. क्युरेटिव्ह पेटीशनवरील ही सुनावणी आता पुर्ण झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राला निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
  • 03:58 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update : राष्ट्रवादीची पक्ष आणि कार्यालये आमचीच - जयंत पाटील

    आम्हीच मूळ पक्ष आहोत.त्यामुळे आम्हाला पक्ष कार्यालयाची मागणी करण्याची गरज नाही, असे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर आहे. त्यामुळे त्यांनी अजून कोणाला आमचे कार्यालय देण्यास परवानगी दिली आहे का? ते पाहावे लागणार आहे. तसेच इलेक्शन कमिशन समोर आम्ही पक्षात वाद नसल्याचे सांगितले आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
  • 03:13 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update: महायुती सरकारच्या काळात सर्वांधिक दंगली, विजय वड्डेटीवारांचा गंभीर आरोप

    महाराष्ट्रात पक्ष फोडून तीन वेगळवेगळ्या दिशेचे सरकार सत्तेत आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. 2022 मध्ये महाराष्ट्रात 8 हजार 218 दंगली घडल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे महायुती सरकार आल्यानंतर दंगली आणि बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा आरोप विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.
  • 02:34 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update: महाराष्ट्रात मराठाच शिल्लक राहणार नाही - छगन भूजबळ

    सगळेच मराठे ओबीसीमध्ये येतायत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाही. सगळे कुणबीच होणार आहेत. त्यामुळे बाकीच्या उपायांची गरज पडणार नाही, असं मोठं विधान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठे कुणबी म्हणून येत आहेत, मग बाहेर कोण राहणार असा सवालही भुजबळ यांनी केला.
  • 02:11 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live Update: केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांचे राजीनामे, पहा यादी

    पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री आणि काही खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील काही खासदारांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे जे खासदार आणि केंद्रीय मंत्री निवडून आले आहे, त्यांनी खासदारकीचे राजीनामे दिले आहेत.
  • 01:12 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live updates : बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी राज ठाकरेंनी शेअर केला जुना फोटो, पोस्ट मध्ये काय?

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी एका पोस्टमधून भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरेयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील या तीन समाजसुधारकांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा अर्थ सांगताना राज ठाकरेंनी एक शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.
  • 12:38 PM • 06 Dec 2023

    Marathi News Live updates : ठाकरे गट काँग्रेसचा अजेंडा राबवतेय - उदय सामंत

    मेट्रो सिटीत झोपडपट्ट्या झाल्या त्याचं कारण काँग्रेस सरकार आहे. बाळासाहेबांच्या हे लक्षात आल्यावर झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम सुरू झाला, असे शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी विकास पुनर्वसनचा निर्णय घेतला, पण त्यानंतर सरकार बदललं, त्यामुळे यावर ठोस निर्णय झाला नाही. आता याला गती मिळणार आहे. त्यामुळे यावर शंका-कुशंका उपस्थित करणं म्हणजे काँगेसचा अजेंडा राबवण्यासारखं असल्याचे म्हणत सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
  • 11:57 AM • 06 Dec 2023

    Marathi News Live updates : संजय राऊत यांच्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार - तानाजी सावंत

    आरोग्य खात्यात खंडणी घेतली जात असल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. यावर आता आरोग्य तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबद्दल माझ्याकडे पत्र आलेले आहे. या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहे. संजय राउतांच्या प्रत्येक पॉईंटला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
  • 11:54 AM • 06 Dec 2023

    Marathi News Live updates : महाराष्ट्रातील सरकार हे अपयशी आणि अकार्यक्षम सरकार - अंबादास दानवे

    नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे समोर आले आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्र गुन्हेगारीत आघाडीवर आहे. गृहमंत्र्यांच्या शहरात सगळ्यात मोठा क्राईम होतो आहे. ड्रग्सच्या विळख्यात अख्खा महाराष्ट्र गुंतलाय. काल रायगड, नवी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाने धाड मारली, महाराष्ट्राचा गृह विभाग झोपला आहे.सरकार सर्व ठिकाणी नुसता दिखावा करते आहे.शासकीय कार्यक्रमाचे राजकीय कार्यक्रमात इव्हेंट करते आहे .जनतेच्या पैशाची लूट सूरू आहे आणि टक्केवारीने राज्यात हदौस माजवला आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी म्हटले.
  • 11:45 AM • 06 Dec 2023

    Manoj Jarange : मराठा समाजाला मुख्यमंत्री शिंदे शंभर टक्के आरक्षण देणार- जरांगे पाटील

    हैदराबादला जी समिती गेली ती चांगला काम करीत आहेत त्याबद्दल दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देणार याचा ठाम विश्वास असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. कुणबी नोंदी तपासण्यासाठी मराठवाड्यात मनुष्यबळ वाढवणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळवणार आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT