लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : ठाकरेंना मोठा झटका! बड्या नेत्याला बजावलं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav thackeray, Anil desai, Anil desai summon
Uddhav thackeray, Anil desai, Anil desai summon
social share
google news

Marathi News Live Update: बारामतीत आज (2 मार्च) नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मंत्री सहभागी झाले आहेत. या रोजगार मेळाव्यात 350 हून अधिक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या मेळाव्यात जवळपास तरुणांना रोजगार मिळणार आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शिक्षण संकुलाच्या मैदानात सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या मासिकात शरद पवारांचे नाव नव्हते, त्यानंतर गदारोळ झाला होता. त्यानंतर सुधारित मासिकात शरद पवारांचे नाव छापण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 06:57 PM • 02 Mar 2024

    ठाकरेंना मोठा झटका! बड्या नेत्याला बजावलं समन्स

    मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतर, ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून 50 कोटी रुपये काढण्यात आले होते. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी ईओडब्ल्यूकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनिल देसाई यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 5 मार्चला अनिल देसाई यांना चौकशीला उपस्थित राहावे लागणार आहे. 
     

  • 05:11 PM • 02 Mar 2024

    'शिंदे गटात सर्वच हिरो, खलनायक वृत्ती समोर येतेय', विजय वडेट्टीवारांचा निशाणा

    आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटात सर्वच हिरो झाले असून त्यांची आता खलनायकी वृत्ती समोर येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

  • 02:40 PM • 02 Mar 2024

    'शासकीय योजनेसाठी गोळा केलेली माहिती निवडणुकीच्या प्रचारासाठी'- सतेज पाटील

    शासकीय योजनेसाठी गोळा केलेल्या माहितीवरून काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आरोप केला आहे. या माहितीचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी काही पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

  • 02:01 PM • 02 Mar 2024

    'बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही' : मुख्यमंत्री

    राज्यातील सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, असा सरकारचा अजेंडा आहे. बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1 चा करणार आहोत. अजित पवारांकडे तिजोरीची चावी आहे. त्यामुळे बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही. हा शब्द मुख्यमंत्री म्हणून मी देतो, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीकरांना दिले आहे. 

  • ADVERTISEMENT

  • 01:33 PM • 02 Mar 2024

    अजितदादा माझं खातं मागतील, पण मी त्यांना ते देणार नाही... : फडणवीस

    आम्ही राजकारणी कॉन्ट्रास्ट पद्धतीने काम करतो..त्यामुळे चांगले काम केले तरच आम्हाला पुन्हा संधी मिळते. येथे रोजगार मिळालेल्या युवकांनी चांगले काम केले तर आयुष्यभर कल्याण. बारामतीतल्या पोलीस ठाण्याच्या इमारती दर्जेदार झाल्या. याचे श्रेय अजित पवारांना जाते.. त्यांना राज्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या इमारती बांधताना अजितदादांची मदत घेवू.. ते हळूच म्हणतील गृहखातेच माझ्या कडे द्या.  ते मी नाही देणार पण मदत जरुर घेईन.. अशी कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मारली आहे.


     

  • 01:31 PM • 02 Mar 2024

    एका-एका कामाला किमान 40 वेळा भेटी दिल्या: अजित पवार

    बारामतीतल्या विविध विकास कामांची पाहणी करुन मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी उद्धाटने केली असती तर बर झाले असते. एका-एका कामाला किमान 40 वेळा भेटी दिल्या पाहणी केली.. त्यामुळे कामे दर्जेदार झाली. असं अजित पवार यावेळी म्हणाले

  • ADVERTISEMENT

  • 12:49 PM • 02 Mar 2024

    शिंदे-फडणवीसांशी संवाद, पण अजितदादांकडे सुप्रिया सुळेंची पाठ

    बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आलेले असताना त्याच कार्यक्रमात खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील सहभागी झाले. याचवेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. मात्र, त्याचवेळी अजित पवारांशी बोलणं मात्र सुप्रिया सुळे यांनी टाळलं. याच कार्यक्रमात सुनेत्रा पवार या देखील हजर असल्याचं पाहायला मिळालं.

  • 12:45 PM • 02 Mar 2024

    बारामतीत अत्याधुनिक बसस्थानकाचं लोकार्पण

    अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले बारामतीतल्या पोलीस उप मुख्यालय, अत्याधुनिक बसस्थानक आणि पोलीस वसाहतीचे उद्धाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

  • 12:44 PM • 02 Mar 2024

    बारामतीत शिंदे-फडणवीसांसह शरद पवार एकाच मंचावर

    नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, निलमताई गोऱ्हे, मंगल प्रभात लोढा, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, सुप्रिया सुळे हे उपस्थित.

follow whatsapp

ADVERTISEMENT