Maharashtra News Live : ''वळसे पाटील कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले"
Marathi News live Updates : लोकसभा निवडणुकीच्या घडामोडी आणि इतर ब्रेकिंग बातम्या वाचा एकाच ठिकाणी...
ADVERTISEMENT
Maharashtra News live Updates : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्य सरकारने १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात मंजूर केले आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच आरक्षण हवं, असं म्हटलं आहे. त्यामुळे पेच कायम आहे. यासंदर्भातील वेगवेगळ्या अपडेट, लोकसभा निवडणुकीच्या घडामोडी आणि इतर ब्रेकिंग बातम्या वाचा एकाच ठिकाणी...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 08:11 PM • 21 Feb 2024
Rohit Pawar : 'वळसे पाटील कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले'
वळसे पाटील साहेबांजवळ इतके आहेत, एका माणसपुत्रासारखे आहेत. जेव्हा पक्ष फुटत होता. तेव्हा 50-55 लोक गेली तरी चालतील आणि कदाचीत जातीलही, पण एक व्यक्ती पवार साहेबांना सोडणार नाही, असे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. ते म्हणजे वळसे पाटील साहेब, असे रोहित पवारांनी सांगितले. पण ते भाजपला घाबरले त्यांच्या कारवाईला घाबरले आणि तुम्हाला सोडून गेले, साहेबांना सोडून गेले. ज्या व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास सोडला, अशा आपल्या साहेबांना ते तिथे सोडून गेले, अशी टीका रोहित पवारांनी वळसे पाटलांवर केली. तसेच एकदा लोकसभा संपली आणि दिल्लीवाल्यांना यांचा उपयोग संपला की भाजपच्या शिक्क्यावर विधानसभा लढवतील अशी, टीका रोहित पवारांनी केली.
- 12:20 PM • 21 Feb 2024
शरद पवारांच्या आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस; कोर्टात काय घडलं?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार यांच्या गटातील आमदारांना अपात्रत ठरवलं नाही. याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले, "माझ्या मते त्यांची कृती पक्षविरोधी होती. विधानसभा अध्यक्ष म्हणतात की, हा पक्षातील अंतर्गत कलह आहे आणि त्यामुळे अपात्रतेची गरज नाही."
"त्यांचा आमच्याशी संबंध नाही, असं मानलं जाऊ शकतं. पण, ती संकल्पना नाही. एकतर तुम्ही राष्ट्रवादीचे आहात किंवा नाही. त्यांची कृती आपत्तीजनक होती, अशी अनेक उदाहरणे आम्ही दाखवली. आम्ही सरकारमध्ये असताना त्यांना वेगळे बसायचे आणि विरोधात बसायचे होते. पण, अध्यक्षांनी माझा पक्षच हाच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला आहे."
"निकाल आमच्याबाजूने लागला आहे, मुख्य निष्कर्ष माझ्या बाजूने आहे, असं असूनही कोणतीही अपात्रता कारवाई होऊ शकत नाही. निवडणूक आयोगामध्येही आम्ही जिंकलो आहोत. हे शिवसेनेच्या याचिकांसारखेच आहे, परंतु प्रकरणातील तथ्य वेगळे आहे", अजित पवार गटाचे वकील रोहतगी यांनी सांगितलं.
त्यांनंतर उच्च न्यायालयाने शरद पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. यासंदर्भातील दोन याचिकांवर १४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी न्यायालयात भूमिका मांडायची आहे.
- 10:10 AM • 21 Feb 2024
विश्वासघात होईल असं मुख्यमंत्र्यांनी वागू नये -जरांगे
"सगेसोयरेची अंमलबजावणी त्यांनी करावी. अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही. समाजाचा विश्वासघात होईल असं मुख्यमंत्र्यांनी वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची भावना ती ढळू देऊ नये. कारण समाजच मोठा असतो, त्यांनी मनानेच सांगावं की शपथ अपूर्ण आहे", असेही जरांगे म्हणाले.
- 10:08 AM • 21 Feb 2024
'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय', जरांगे शिंदे सरकारबद्दल स्पष्टच बोलले
अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "काल त्यांनी बघितलं काय परिणाम झाले. काल अधिवेशनात सगेसोयरेचा विषय घ्यायला हवा होता. त्यांना राज्यभर अपेक्षित हवं होतं, ते झालं नाही. कारण लोकांचं म्हणणं ओबीसी आरक्षण आहे. १२ वाजेपर्यंत सगळे बांधव येतील आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवू", असे मनोज जरांगे म्हणाले.
"राजकारण समोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्यांच्या मतांवर पुन्हा निवडणूक यायचं आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करायचं. मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि त्यांनी निवडणुकीच्या काळात तुमचेच आहे म्हणायचं आणि तिकडे गेल्यावर त्यांच्याकडून बोलायचं. हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं आहे. पण, त्यांना हे लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे", अशी टीका जरांगे यांनी केली.
ADVERTISEMENT