उद्धव ठाकरेंनी ‘तो’ निर्णय घेतला! बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली असली, तरी राजकीय संघर्ष सुरूच आहे. बंडखोर आमदारांना सोबत घेत […]
ADVERTISEMENT
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली असली, तरी राजकीय संघर्ष सुरूच आहे. बंडखोर आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांबाबत काय भूमिका घेतली जाईल, असा प्रश्न होता.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे यांना सर्वपदावरून हटवण्यात आल्याचं एक पत्र समोर आलं आहे. ३० जून रोजीचं हे पत्र आहे. त्यावर सुरूवातीलाच एकनाथ शिंदे यांचं नाव असून, उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे.
पक्षविरोधी कृत्यांमध्ये तुमचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवसेनेचं सदस्यत्व सोडलेली आहे. त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्या अधिकारांचा वापर करत तुम्हाला पक्षाच्या सर्व पदावरून काढण्यात येत आहे, असं या पत्रात म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २१ जून रोजी अचानक शिवसेनेविरोधात बंडखोरी केली होती. तब्बल आठवडाभर ते शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन महाराष्ट्राबाहेर होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आवाहन केलं, पण…
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतरच शिवसेनेत बंड उफाळून आलं होतं. पक्षाचे अनेक आमदार एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. राज्याबाहेर असलेल्या या आमदारांना परत येण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं होतं.
सुरूवातील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. सरकार कोसळण्याच्या एक दिवस आधीही त्यांनी परत येण्याचं आवाहन केलं होतं. कुटुंबप्रमुख म्हणून मला तुमची काळजी वाटतेय. तुम्ही अजूनही शिवसैनिक आहात आणि चर्चेतून मार्ग काढूया, असं भावनिक आवाहन ठाकरेंनी केलं होतं. मात्र, बंडखोर आमदार भूमिकेवर ठाम राहिले.
बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. भाजप-शिवसेना युती नैसर्गिक आहे. बाळासाहेबांचं हिदुत्व पुढे घेऊन जायचं आहे आणि विकास कामांवर लक्ष देणार असल्याची भूमिका शिंदेंकडून वारंवार मांडण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT