शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या 15 आमदारांना केंद्रांचं ‘सुरक्षा कवच’; मोदी सरकारचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर आता केंद्र सरकारची एन्ट्री झालीये. शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीत राहायचं नाही, अशी भूमिका घेत बंडाचा झेंडा फडकावला. या आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांकडून हल्ले होत असून, आता केंद्र सरकारने त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे ४० पेक्षा अधिक आमदार बंडखोरी केल्यापासून राज्याबाहेर आहेत. आमदारांनी आसामची राजधानी गुवाहाटीत मुक्काम ठोकला असून, इकडे राज्यात बंडखोरीचे पडसाद उमटू लागले आहेत.

बंडखोरी करणाऱ्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहे. शुनिवारी पुणे, ठाणे जिल्ह्यात याचे पडसाद उमटले. त्यानंतर आजही शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून, आमदारांकडून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेविरोधात आमदारांचं बंड; राजकीय लढाईत आता रश्मी ठाकरेंनी हाती घेतली सुत्रं

याच पार्श्वभूमीवर आता केंद्राची एन्ट्री झाली असून, केंद्र सरकारने बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी १५ आमदारांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाची वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसर आमदार रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनावणे, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, योगेश कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जयस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर, संदीपान भुमरे यांना सीआरपीएफची वाय प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे.

‘मी नारायण राणेंना मानतो’; संजय राऊतांना राणेंच्या हिमतीची बंडखोरांमुळे झाली आठवण

आमदारांनी काय केला होता आरोप?

बंडखोर आमदारांच्या गटातील काही जणांनी राज्य सरकारने सुरक्षा काढल्याचा आरोप केला होता. आमदार असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार आम्हाला घरी देण्यात सुरक्षा सुड भावनेनं बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. इतकंच नाही, तर माध्यमातून समोर आलेल्या रिपोर्टमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून कार्यकर्त्यांकरवी हिंसा घडवून आणण्याचाही आम्हाला धमकावण्याचा अजेंडा आहे, असं या पत्रात म्हटलेलं होतं.

संजय राऊत यांच्याकडूनही धमकी दिली गेलीये, असंही या पत्रात म्हटलेलं आहे. सर्व आमदारांना सभागृहात येऊ द्या. जे आमदार सोडून गेलेत, त्यांना बघून घेऊ. परत आल्यानंतर आणि महाराष्ट्रात फिरताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागले, असं राऊत म्हणाले असल्याचं आमदारांनी पत्रात म्हटलेलं होतं.

“त्यांनी आईला सोडलंय, फडणवीसांना काय साथ देणार?”; संजय राऊतांनी बंडखोरांना दिलं आव्हान

आमच्या कुटुंबियांना काही इजा पोहोचली, तर याला मुख्यमंत्री, शरद पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते जबाबदार असतील, असं या आमदारांनी म्हटलं होतं.

राज्य सरकारनं केला खुलासा

आमदारांच्या आरोपानंतर राज्य सरकारने हे वृत्त फेटाळून लावलेलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी खुलासा केला होता. “राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृह विभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत,” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

राज्य सरकारने आमदारांची सुरक्षा काढलेली नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर आज केंद्राने १५ आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजप असल्याच्या चर्चेनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT