लाइव्ह

Bharat Nyay Yatra : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार न्याय यात्रा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 08:11 PM • 04 Jan 2024

    अब्दुल सत्तारांच्या फोटोला शेण फासले-प्रहार जनशक्तीचे आंदोलन

    शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटोला शेण फासून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. ज्या लोकांच्या मतांवर निवडून येता त्या लोकांना मारण्याची भाषा करता असं म्हणत नागरिकांनी आज फोटोला शेण फासले. भविष्यात अब्दुल सत्तार सोलापुरात आल्यास त्यांच्या तोंडाला शेण फासू असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.
  • 05:04 PM • 04 Jan 2024

    भारत न्याय यात्रेचा असा आहे मार्ग

    राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा १४ जानेवारीपासून सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यात भारत जोडो यात्रेचे नाव भारत न्याय यात्रा असे करण्यात आले आहे. इम्फाळपासून ही यात्रा सुरू होत असून, शेवट मुंबईत होणार आहे.
  • 02:59 PM • 04 Jan 2024

    हाड हाड च्या खाटिकखान्यात सश्रद्ध हिंदूंच्या भावनांवर...; चित्रा वाघांचं आव्हाडांवर शरसंधान

    जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता, असे विधान केले. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर खेद व्यक्त करतो, असे म्हटले. आव्हाडांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लक्ष्य केले.
  • 12:06 PM • 04 Jan 2024

    सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू सिंधुदुर्गृ-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. उदय सामंत यांनी या मतदारसंघात शिवसेनेची मत बँक जास्त असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे दावा केला आहे. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघावर पहिला दावा आमचा असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी भाजपचाच खासदार होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे राणे-सामंत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
  • ADVERTISEMENT

  • 10:08 AM • 04 Jan 2024

    अजित पवारांना आव्हाडांनी सुनावले

    प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानाने वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर निदर्शने केली. त्यानंतर आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य करत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुनावलं.
  • 09:41 AM • 04 Jan 2024

    तुम्हाला मतदानाची वेळ आली की हिंदुत्व आठवते -राम कदम

    जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. आमदार आव्हाड यांच्या विधानानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी या वादात उडी घेतली असून, उद्धव ठाकरेंनाही सुनावले आहे.
  • ADVERTISEMENT

  • 09:32 AM • 04 Jan 2024

    भाजपची जितेंद्र आव्हाडांवर टीका

    जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या टीकेनंतर भाजपने संताप व्यक्त केला आहे. हिंदुद्वेषी म्हणत भाजपने आव्हाडांवर टीका केली आहे. भाजप महाराष्ट्र या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हॅण्डलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "साडे तीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन!! कधी काळी प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा, आज त्यांचं अस्तित्व सांगतोय आणि आता तर चक्क खोटे रामायणाचे धडे देऊ लागलाय. संकष्टी चतुर्थीला मटणाचे खांड चघळणाऱ्या भांड स्वयंघोषित नेत्याला सकल हिंदू समाज जागा दाखवणार", असे भाजपने म्हटले आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT