Maharashtra Corona Cases: चिंताजनक… महाराष्ट्रात दिवसभरात 393 रुग्णांचा मृत्यू, रुग्णांचा आकडाही वाढला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (10 जून) दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 12,207 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र, गेल्या 24 तासात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही वाढलीच आहे. पण चिंताजनक बाब म्हणजे मृतांचा (Corona Deaths) आकडा देखील वाढला आहे. आज राज्यात तब्बल 393 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 1,03,748 जणांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 60 हजार 693 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात आज 11,449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 56,08,753 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.45 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 393 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.77 टक्के एवढा आहे.

भारतात 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय?

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,73,56,704 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,76,087 (15.73 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10,76,165 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,60,693ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

  • मुंबई (Mumbai) – 18 हजार 157

ADVERTISEMENT

  • ठाणे (Thane) – 15 हजार 975

  • पुणे (Pune) – 19 हजार 521

  • नागपूर (Nagpur) – 7 हजार 168

  • नाशिक (Nashik)- 6 हजार 294

  • कोल्हापूर (Kolhapur) – 17 हजार 370

  • अहमदनगर (Ahmednagar) – 4 हजार 955

  • सातारा (Satara) – 10 हजार 634

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 1 हजार 828

  • लातूर (Latur) – 2 हजार 667

  • कोरोना काळात खासगी हॉस्पिटल मनमानी करीत असेल तर काय करावे?

    प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 19 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय कोल्हापुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 17 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

    मुंबईत दिवसभरात सापडले 660 रूग्ण पॉझिटिव्ह

    मुंबईत दिवसभरात 660 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 768 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 81 हजार 288 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. डबलिंग रेट 566 दिवसांवर गेला आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT