Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात 24 तासात सापडले 3 हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra)अद्यापही तीन हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मागील 24 तासातही (Corona Paitents)3206 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना संसर्ग कायम असल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असताना देखील कोरोना रुग्णाचा आकडा फारसा नियंत्रणात नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 36 रुग्णांचा […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra)अद्यापही तीन हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मागील 24 तासातही (Corona Paitents)3206 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना संसर्ग कायम असल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असताना देखील कोरोना रुग्णाचा आकडा फारसा नियंत्रणात नसल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
गेल्या 24 तासात तब्बल 36 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,38,870 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 3206 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही महिन्यात रुग्णांची आकडेवारी ही थोडीशी कमी होताना दिसतेय. पण असं असलं तरी हा रुग्णांचा आकडा म्हणावा तेवढा कमी झालेला नाही. राज्यात सध्या 37 हजार 860 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हे वाचलं का?
राज्यात 26 सप्टेंबर रोजी 32 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 63,64,027 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.24 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,81,58,000 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,44,325 (11.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,61,072 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,515 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 37,860 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
ADVERTISEMENT
-
मुंबई (Mumbai) – 5 हजार 166
ठाणे (Thane) – 5 हजार 862
पुणे (Pune) – 9 हजार 386
नागपूर (Nagpur) – 141
नाशिक (Nashik)- 1 हजार 010
कोल्हापूर (Kolhapur) – 543
अहमदनगर (Ahmednagar) – 4 हजार 935
सातारा (Satara) – 2 हजार 570
सांगली (Sangli)- 1 हजार 487
औरंगाबाद (Aurnagabad)- 502
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 9 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात 5 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये देखील सध्या 4 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
Covid 19: ‘कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक’
मुंबईत दिवसभरात सापडले 479 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 479 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 481 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 18 हजार 002 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. डबलिंग रेट 1208 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
२६ सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/Use9nsTR8Q— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 26, 2021
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT