Maharashtra Corona Update: 24 तासात महाराष्ट्रात 4 हजाराहून अधिक नवे रुग्ण, 116 मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)4408 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसत आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने आता जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. पण असं असलं तरीही कोरोना मृतांचा आकडा काही म्हणावा तसा कमी झालेला नाही.

ADVERTISEMENT

गेल्या 24 तासात तब्बल 116 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,35,255 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 4408 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 61 हजार 306 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

राज्यात 17 ऑगस्ट रोजी 5424 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62,01,168 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.87 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 116 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.11 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,12,91,383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,01,213 (12.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,53,807 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,233 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 61,306 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

  • मुंबई (Mumbai) – 3 हजार 048

  • ठाणे (Thane) – 6 हजार 985

  • पुणे (Pune) – 14 हजार 325

  • नागपूर (Nagpur) – 188

  • नाशिक (Nashik)- 1 हजार 122

  • कोल्हापूर (Kolhapur) – 3 हजार 157

  • अहमदनगर (Ahmednagar) – 5 हजार 747

  • सातारा (Satara) – 6 हजार 797

  • सांगली (Sangli)- 5 हजार 915

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 519

  • प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 14 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे आणि सातारा जिल्ह्यात 6-6 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे सांगलीमध्ये देखील सध्या 5 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT