महाराष्ट्रात दिवसभरात 51 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह, तर 65 हजारांपेक्षा जास्त रूग्ण झाले बरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 51 हजार 880 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 65 हजार 934 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये 891 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला मुंबईत 6 लाख 41 हजार पॉझिटिव्ह केसेस आहेत. तर आत्तापर्यंत राज्यात एकूण 71 हजार 742 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2 कोटी 81 लाख 5 हजार 382 नमुने चाचणी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 48 लाख 22 हजार 902 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज घडीला राज्यात 39 लाख 36 हजार 323 होम क्वारंटाईन आहेत. 30 हजार 356 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

मुंबईत दिवसभरात 2554 रूग्ण पॉझिटिव्ह, तर 5240 रूग्ण कोरोनामुक्त

हे वाचलं का?

महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 41 लाख 7 हजार 92 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 85.16 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 51 हजार 880 रूग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या आता 48 लाख 22 हजार 902 इतकी झाली आहे.

Oxygen च्या बाबतीत महाराष्ट्र लवकरच स्वयंपूर्ण होणार-राजेश टोपे

ADVERTISEMENT

दिवसभरात नोंद झालेल्या 891 मृत्यूंपैकी 397 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 258 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 236 मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीपेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू नागपूर 59, नाशिक 29, जळगाव 20, नंदुरबार 18, पुणे 17, चंद्रपूर 12, औरंगाबाद 8, भंडारा 8, गडचिरोली 5, जालना 4, गोंदिया 3, नांदेड 3, सोलापूर 3, वाशिम 3, अहमदनगर 2, सांगली 2, यवतामाळ 2, हिंगोली 2, हिंगोली 1, कोल्हापूर 1, लातूर 1, पालघर 1, परभणी 1, रायगड 1, रत्नागिरी 1 आणि सातारा 1 असे आहेत. पोर्टलनुसार ही संख्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत या मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Vaccine Shortage- मुंबईतल्या BKC मधलं सर्वात मोठं लसीकरण केंद्र बंद

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णसंख्या

मुंबई – 56 हजार 465

ठाणे- 45 हजार 516

पालघर-17 हजार 783

रायगड-11 हजार 590

पुणे- 1 लाख 9 हजार 531

सांगली-16 हजार 431

कोल्हापूर-11 हजार 961

सोलापूर-20 हजार 448

नाशिक-45 हजार 605

अहमदनगर-20 हजार 657

जळगाव-12 हजार 556

औरंगाबाद-12 हजार 207

बीड -14 हजार 30

लातूर-13 हजार 459

बुलढाणा-13 हजार 106

नागपूर- 64 हजार 554

चंद्रपूर – 28 हजार 597

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT