दिवसभरात तब्बल 55 हजार नवे कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर
मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती फारच गंभीर असल्याचं दिसून येतंय. कारण आज (6 एप्रिल) पुन्हा एकदा राज्यात तब्बल 55 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 55 हजार 469 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 297 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात 4 लाख 72 हजार 283 अॅक्टिव्ह रुग्ण […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती फारच गंभीर असल्याचं दिसून येतंय. कारण आज (6 एप्रिल) पुन्हा एकदा राज्यात तब्बल 55 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 55 हजार 469 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 297 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात 4 लाख 72 हजार 283 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. हे कठोर निर्बंध 5 एप्रिलपासून लागू झाले आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असणार आहेत.
राज्यात आज 34,256 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 25,83,331 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.98 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 277 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.81 टक्के एवढा आहे.
हे वाचलं का?
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होईना, दिवसभरात किती नवे रुग्ण सापडले?
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,09,17,486 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31,13,354 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,55,498 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,797 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 4,72,283 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
‘शेजारील राज्यांकडून Oxygen चा पुरवठा केला जावा’, महाराष्ट्रावर का ओढावलीय अशी वेळ?
ADVERTISEMENT
‘शेजारील राज्यांकडून Oxygen चा पुरवठा केला जावा’, महाराष्ट्रावर का ओढावलीय अशी वेळ?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई – 79 हजार 368
-
ठाणे- 61 हजार 127
-
पुणे- 84 हजार 309
-
नागपूर- 57 हजार 371
-
नाशिक- 31 हजार 688
-
अहमदनगर- 17 हजार 405
-
जळगाव- 7 हजार 770
-
औरंगाबाद- 17 हजार 818
-
लातूर – 8 हजार 386
-
नांदेड- 11 हजार 418
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास मुंबई पाठोपाठ पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 84 हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात 57 हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईत दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 10 हजार 030 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 7 हजार 019 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 82 हजार 004 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. डबलिंग रेट 38 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT