आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारणार; कामाख्या देवीला जाणाऱ्या भाविकांसाठी CM शिंदेंचा निर्णय
गुवाहटी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतचं गुवाहटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान गुवाहटीहून परत येताना शिंदेंसह सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री, मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता बंड यशस्वी झाल्याचा दावा करत एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी पुन्हा […]
ADVERTISEMENT
गुवाहटी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतचं गुवाहटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान गुवाहटीहून परत येताना शिंदेंसह सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री, मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता बंड यशस्वी झाल्याचा दावा करत एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा गुवाहटीला जाऊन कामाख्या देवीचा आशीर्वाद घेतला.
ADVERTISEMENT
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शनासाठी येणाऱ्या इतर भाविकांचीही चांगली सोय व्हावी यासाठी आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभं करणार असल्याचं सांगितलं आहे. यासाठी त्यांच्याकडे आसाममध्ये कार्यरत असणाऱ्या मराठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने मागणी केली होती. याच मागणीचा सकारात्मक विचार करुन यासाठीच्या सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी समन्वयक म्हणून मंत्री दादाजी भुसे यांची नियुक्ती केली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
ट्विटरवरुन याबाबतचा निर्णय जाहीर करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आसाम राज्यात कार्यरत असणाऱ्या मराठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या सदस्यांनी काल सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र राज्यातून माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा पुरवण्याचे काम हे मंडळ अविरतपणे करते.
हे वाचलं का?
#आसाम राज्यात कार्यरत असणाऱ्या #मराठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या सदस्यांनी काल सदिच्छा भेट घेतली.#महाराष्ट्र राज्यातून माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा पुरवण्याचे काम हे मंडळ अविरतपणे करते. pic.twitter.com/s7AZaSVCzt
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2022
याबाबत सकारात्मकता दर्शवत दोन राज्यांना सांस्कृतिक दृष्टीने जोडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी राज्यातील बंदरे आणि खनिकर्म मंत्री @dadajibhuse यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2022
मात्र एवढ्यावरच न थांबता इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची कायमची सोय व्हावी यासाठी आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारावे तसेच महाराष्ट्र आणि आसाम राज्यांमध्ये असलेली भक्ती परंपरा, वीररसाची परंपरा, भाषिक आणि सांस्कृतिक साम्यानुसार इथे सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सकारात्मकता दर्शवत दोन राज्यांना सांस्कृतिक दृष्टीने जोडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी राज्यातील बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT