Oxygen express : कोरोनाच्या अंधारात महाराष्ट्रासाठी नवा आशेचा किरण..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासतो आहे. महाराष्ट्र सरकार आता इतर राज्यांमधून ऑक्सिजन मागवण्याच्या तयारीत आहे. भारतीय रेल्वे या संदर्भात आता राज्य सरकारला मदत करतं आहे. आज लिक्विड ऑक्सिजनचे डबे कळंबोलीवरून विशाखापट्टणम, जमशेदपूर, रूरकेला, बोकारो या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनसाठी पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त यांच्या वतीने हे टँकर्स पाठवण्यात आले आहे. तसंच यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

Oxygen Plant: हवेतून दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती, महाराष्ट्रात कुठे सुरु होणार प्लांट?

आम्ही रेल्वेच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांनाही या ऑक्सिजन एक्स्प्रेसची आणि ग्रीन कॉरिडॉरची माहिती दिली आहे असंही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. हे टँकर्स भरून महाराष्ट्रात पुन्हा पाठवले जाणार आहेत. लिक्विड ऑक्सिजन इतर राज्यांमधून महाराष्ट्राला मिळण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल ठरलं आहे.

हे वाचलं का?

आता प्राथमिक टप्प्यात आम्ही दहा टँकर्स पाठवत आहोत. हे टँकर्स लिक्विड ऑक्सिजन भरून आपल्या राज्यात आणतील. आमची क्षमता असे तीस टँकर्स वाहून आणण्याची आहे. यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत. महाराष्ट्राला ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे तो भरून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये आढळलं डबल म्युटेशन – राजेश टोपे

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजवर अनेकदा महाराष्ट्राला असलेली ऑक्सिजनची गरज बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनही केला होता. महाराष्ट्रातल्या ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीरची कमतरता याबद्दल चर्चा करणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारात आहेत ते तुम्हाला फोन करतील असं सांगण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याबद्दल काहीही चर्चा होऊ शकली नाही.

ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, केली महत्त्वाची मागणी

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ऑक्सिजनबाबतची कमतरता वारंवार बोलून दाखवली आहे. 18 तारखेला म्हणजेच रविवारीही राजेश टोपेंनी हे सांगितलं होतं की महाराष्ट्राला ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. इंडस्ट्रीला लागणारा सगळा ऑक्सिजनचा वापर आम्ही बंद केला आहे आणि तो वैद्यकीय सेवेकडे वळवला आहे तरीही ऑक्सिजन कमी पडतो आहे त्यामुळे शेजारील राज्यांमधून लिक्विड ऑक्सिजन मागवावा लागणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या दोन्ही मागण्यानंतर केंद्र सरकारने ही बाब स्पष्ट केली की महाराष्ट्राला लवकरच 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT