Maharashtra SSC Result 2021: MSBSHSE 10th निकालाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेचा निकाल (Maharashtra board SSC result 2021) 16 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल जाहीर करण्याआधी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालांची विभागवार माहिती देण्यात येईल. त्यानंतर दुपारी एक वाजता mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात येईल.

ADVERTISEMENT

दहावीचे विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतात. www.maharashtraeducation.com आणि www.examresults.net/maharashtra या दोन वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. तसंच mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे जाऊन देखील निकालाची ऑनलाइन प्रत आपल्याला मिळू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.

2020 साली दहावीचा किती टक्के निकाल लागला होता?

हे वाचलं का?

2020 साली 15,84,264 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षी दिली होती. ज्यापैकी 15,01,105 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे राज्यातील एकूण निकाल 95.30 टक्के एवढा लागला होता. त्यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल देखील चांगला लागला होता. 92.73 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तसेच पुनर्परीक्षा देणारे 75.86 टक्के विद्यार्थीही उत्तीर्ण झाले होते.

दरम्यान, 5 लाख 50 हजार 809 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत (First Class) तर 3 लाख 30 हजार 588 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत (Second Class)आणि 80,335 विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत (Pass Class)उत्तीर्ण झाले होते.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 | महाराष्ट्र इयत्ता 10 वीचा निकाल 2021, MSBSHSE 10वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2021

ADVERTISEMENT

  • परीक्षेचं नाव – महाराष्ट्र उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा

  • निकाल – महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 (Maharashtra SSC Result 2020)

  • निकाल जाहीर करण्याचा अधिकार – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)

  • अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in

  • निकालाची तारीख – 16 जुलै 2021

  • 10वीचा निकाल 2021 – ग्रेडिंग सिस्टम कशी?

    • 75% आणि त्यापुढे – Distinction

    • 60% आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)

    • 45% to 59% – द्वितीय श्रेणी (Second Class)

    • 35% to 44% – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)

    • 35% पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

    SSC Result 2021: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)

    2020 मध्ये कसा होता दहावीचा विभागनुसार निकाल?

    • मुंबई- 96.72%

    • पुणे- 97.34%

    • नाशिक – 93.73%

    • नागपूर – 93.84%

    • कोकण – 98.77%

    • कोल्हापूर – 97.64%

    • अमरावती – 95.14%

    • लातूर – 93.07%

    • औरंगाबाद – 92%

    Maharashtra SSC Result 2021: 10वीचा ऑनलाइन निकाल ‘इथे’ पाहता येणार, पाहा निकालाच्या वेबसाइट कोणत्या

    10वी निकालाची तारीख, वेळ (Maharashtra SSC Result 2021 Date and Time)

    महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 Maharashtra SSC Result 2021 – 16 जुलै 2020 (शुक्रवार) दुपारी 1:00 वाजता

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT