Maharashtra Unlock News : आजपासून अनेक शहरांतील निर्बंध शिथील होणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आज सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर अनलॉक व्हायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने या अनलॉकसाठीचे नियम व निकष हे शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केले होते. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर मुंबई, नागपूर, ठाणे आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये महापालिका प्रशासनाने अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. Gadchiroli Unlock Guideline: गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आज सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर अनलॉक व्हायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने या अनलॉकसाठीचे नियम व निकष हे शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केले होते. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर मुंबई, नागपूर, ठाणे आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये महापालिका प्रशासनाने अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
Gadchiroli Unlock Guideline: गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु, पाहा काय सुरु, काय बंद
अनलॉकसाठीचे नियम व निकष ठरवताना राज्य सरकारने पाच स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आहे. या शहरांत कोरोनाची परिस्थिती कशी आहे याचा अंदाज घेऊन निर्बंध कडक करायचे की शिथील याचा निर्णय घेण्याचा अधिकारी स्थानिक प्रशासनाला दिला आहे. यात ठाणे शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात करण्यात आला असून इथे दुकानं दिवसभर खुली राहणार आहेत. मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरात असून इथे संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानदारांना मुभा देण्यात आलेली आहे.
हे वाचलं का?
Unlock News : नवी मुंबईचा दुसऱ्या स्तरात समावेश, जाणून घ्या काय सुरु काय बंद?
निर्बंध शिथील करत असताना राज्य सरकारने मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, सोलापूर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून जाहीर केले. यात मुंबई, पुणे, नाशिक, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली या महापालिका तिसऱ्या स्तरात येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील आणि इतर सारी दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ४ पर्यंत खुली राहणार आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दुकानं शनिवार-रविवार बंद राहणार आहेत. याव्यतिरीक्त मॉल्स-नाट्यगृह बंदच राहणार असून हॉटेल आणि रेस्टॉरंटही सकाळी ७ ते ४ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
ADVERTISEMENT
Maharashtra Unlock : मुंबई कितव्या टप्प्यात? लोकल सेवेबद्दल काय झाला निर्णय, जाणून घ्या…
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त मालिका चित्रीकरणाला बायो सिक्युअर बबलमध्ये परवानगी, सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमांना क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत परवानगी, लग्न आणि इतर सोहळे ५० माणसांच्या उपस्थितीत, व्यायामशाळा, सलून, केश कर्तनालय ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. हेच नियम नाशिक, पालघर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वाशिम यासारख्या जिल्ह्यांमध्येही कायम असणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही जनतेसह स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले असून ज्या भागांत परिस्थिती आटोक्यात येत नसेल आणि शंकेला वाव असेल तिकडे निर्बंध सुरुच ठेवा असाही सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्यावर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला, कुठल्याही दबावाला बळी पडू नका. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.
मुंबईत नव्या गाईडलाईन्स, सोमवारपासून काय होणार Unlock जाणून घ्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT