Maharashtra Unlock : उपराजधानी नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात, जिल्हाधिकाऱ्यांकडून Guideline जाहीर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना दोन महिन्यांचा कालावधी लॉकडाउनमध्ये काढल्यानंतर महाराष्ट्रात आजपासून अनलॉकची प्रक्रीया सुरु होते आहे. अनलॉक जाहीर करताना राज्य शासनाने रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता हे दोन निकष ठरवले आहेत. राजधानी मुंबई या निकषांमध्ये तिसऱ्या स्तरात येत आहे, तर उपराजधानी नागपूर या निकषांमध्ये पहिल्या स्तरावर बसत असून जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून होणाऱ्या […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना दोन महिन्यांचा कालावधी लॉकडाउनमध्ये काढल्यानंतर महाराष्ट्रात आजपासून अनलॉकची प्रक्रीया सुरु होते आहे. अनलॉक जाहीर करताना राज्य शासनाने रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता हे दोन निकष ठरवले आहेत. राजधानी मुंबई या निकषांमध्ये तिसऱ्या स्तरात येत आहे, तर उपराजधानी नागपूर या निकषांमध्ये पहिल्या स्तरावर बसत असून जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून होणाऱ्या अनलॉकसाठी नियमावली जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये सध्या कोरोना रुग्णांचा पॉजिटीव्हीटी रेट हा ५ टक्क्यांपेक्षा कमी असून २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड सध्या भरले आहेत. राज्य शासनाने अनलॉकचे नियम जाहीर केले असले तरीही स्थानिक भागातली कोरोनाची परिस्थिती पाहता हे निर्बंध शिथील करायचे की कडक याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी रविवारी नियमावली जाहीर केली.
असेल असतील नागपूर शहरातले अनलॉकचे नवे नियम –
हे वाचलं का?
१) अत्यावश्यक सेवेतली दुकानं – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
२) अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
ADVERTISEMENT
३) मॉल-थिएटर, मल्टिप्लेक्स, सिंगल थिएटर, नाट्यगृह – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, ५० टक्के क्षमतेने
ADVERTISEMENT
४) रेस्टॉरंट – रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने
५) लोकल ट्रेन – नियमीत सुरु राहतील
६) सार्वजिनक जागा, मोकळी मैदानं, सायकलिंग ट्रॅक – सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील
७) खासगी कार्यालय – संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
८) क्रीडा – आऊटडोअर स्पर्धा फक्त सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत
९) सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम – ५० टक्के क्षमतेने किंवा किमान १०० माणसांची मर्यादा
१०) चित्रीकरण – नियमीत सुरु राहिल
११) लग्न आणि इतर समारंभ – १०० माणसांची मर्यादा किंवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के
१२) अंत्यविधी – फक्त ५० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी
याव्यतिरीक्त नागपुरातील बांधकाम नियमीत वेळेत सुरु राहणार असून ई-कॉमर्स सेवेलाही परवानगी देण्यात आली आहे. नागपुरात अजुनही जमावबंदी लागू असून जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर्सही संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेतील बससेवाही पूर्णवेळ सुरु राहणार असून यावेळी मात्र प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येणार नाहीये. याचसोबत शाळा-कॉलेज, कोचिंग क्लास, धार्मिक स्थळं, स्विमींग पूल बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय.
Maharashtra Unlock News : आजपासून अनेक शहरांतील निर्बंध शिथील होणार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT