Maharashtra Unlock : मुंबई कितव्या टप्प्यात? लोकल सेवेबद्दल काय झाला निर्णय, जाणून घ्या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयामार्फत शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकचे नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. सोमवारपासून राज्यात अनलॉक जाहीर करण्यात आलं असून, रुग्णांचा पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषांवर जिल्हे ७ जून पासून अनलॉक करण्यात येणार आहेत. या दोन निकषांच्या आधारावर राज्य सरकारने जिल्ह्यांची गटवारी केली आहे. Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयामार्फत शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकचे नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. सोमवारपासून राज्यात अनलॉक जाहीर करण्यात आलं असून, रुग्णांचा पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषांवर जिल्हे ७ जून पासून अनलॉक करण्यात येणार आहेत. या दोन निकषांच्या आधारावर राज्य सरकारने जिल्ह्यांची गटवारी केली आहे.
ADVERTISEMENT
Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…
मुंबई या गटवारीत तिसऱ्या टप्प्यात येत आहे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉजिटीव्हीटी रेट हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांचा पहिल्या गटात समावेश करण्यात आला असून या ठिकाणी लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे हे दोन जिल्हे तिसऱ्या गटात येत आहेत. त्यामुळे सरकारी नियमांनुसार या जिल्ह्यात लोकल प्रवास हा सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी, महिला आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्य़क्ती करु शकणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
हे वाचलं का?
तिसऱ्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी –
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
ADVERTISEMENT
Maharashtra Unlock News : E-Pass च्या नियमांमध्येही महत्वाचे बदल, प्रवास करताना तुम्हाला परवानगी लागणार का?
ADVERTISEMENT
तिसऱ्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांसाठी हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत?
संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्क दुकानं सुरु ठेवण्यात येतील. इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु असतील तर शनिवार-रविवारी बंद असतील.
याव्यतिरीक्त मॉल्स-थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेनं दुपारी २ पर्यंत खुली राहतील आणि त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० टक्के क्षमतेनं खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार स्टुडियोत चित्रीकरण करता येणार आहे. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेसह दुपारी २ पर्यंत खुले असणार आहेत. बांधकामांना दुपारी दोन पर्यंत मुभा असणार आहे. जमावबंदीसंचारबंदी कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT