महाविकास आघाडी हे अत्यंत गोंधळलेलं सरकार, कोणावर कारवाई करायची त्यांना कळत नाही-फडणवीस
महाविकास आघाडी हे अत्यंत गोंधळलेलं सरकार आहे. कोणावर काय कारवाई करायची ते त्यांना कळत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला हे सरकार मागेपुढे पाहतं. पण कुणावर काय कारवाई करायची हे या सरकारला समजत नाही. राज्यात सरकार आहे पण शासन नाही. कुठल्याही प्रकारचा […]
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी हे अत्यंत गोंधळलेलं सरकार आहे. कोणावर काय कारवाई करायची ते त्यांना कळत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
ADVERTISEMENT
जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला हे सरकार मागेपुढे पाहतं. पण कुणावर काय कारवाई करायची हे या सरकारला समजत नाही. राज्यात सरकार आहे पण शासन नाही. कुठल्याही प्रकारचा फोकस नाही. वीज बिल कनेक्शन कापली जात आहेत. दारूचे दर कमी करत आहेत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं या सरकारला शक्य नाही. सरकारमधल्या भ्रष्ट लोकांवर कधी कारवाई करणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
हे वाचलं का?
पुण्याच्या लोणावळ्यात स्मशानभूमीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. तेंव्हा फडणवीसांनी स्मशानभूमीच्या उदघाटनाला चला म्हटलं की मला भीतीच वाटते, असं म्हणताना त्याचं कारण ही त्यांनी सांगून टाकलं. फडणवीस म्हणाले, मी नागपूरचा महापौर असताना, तेव्हाच्या विरोधीपक्ष नेत्यांच्या वॉर्डात गेलो होतो. तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी मला पहिलं लाकूड मला ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं. त्यानंतर टेम्भा हातात देऊन अग्नी ही द्यायला लावला. असं म्हणताच एकच हशा पिकला. पण सुदैवाने तुम्ही तसं काही केलं नाही. हे माझं नशीब म्हणायचं, असंही ते म्हणाले.
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले होते फडणवीस?
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक समृद्ध राज्य म्हणून ओळखलं जातं. या सरकारने कोव्हिडच्या संदर्भात स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे मग देशातल्या एकूण मृत्यूंपैकी महाराष्ट्रात 35 टक्के मृत्यू का झाले याचं उत्तर हे सरकार का देत नाही? असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. दारूची दुकानं उघडी ठेवा आणि मंदिरं उघडू नका असं आम्ही म्हणणं सरकारला अपेक्षित होतं का? कोव्हिड प्रोटोकॉल मंदिरांनी पाळला. आम्ही मंदिरं उघडण्याची मागणी कोरोना वाढवण्यासाठी केली नाही तर त्या मंदिरांवर जे अवलंबून असलेलं अर्थकारण आहे त्यासाठी केली होती. या सरकारने पेट्रोल डिझेलवरचे भाव कमी केले नाही पण दारूचे दर कमी केले. याला काय म्हणायचं? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
कोव्हिडच्या एवढ्या मोठ्या काळात एकदाही विरोधी पक्षनेत्याला बोलावलं नाही. पहिल्या मिटिंगला बोलावलं त्यानंतर यांनी मिटिंगच घेतली नाही. संकटाचं रूपांतर संधीमध्ये करायला हवी होती. मात्र या सरकारने प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. संधीसाधूपणा केला. कोव्हिड काळात कसला भ्रष्टाचार केला नाही? मुंबई सोडून इतरांना काय हे सरकार दुय्यम नागरिक समजतं आहे का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT