Mahul Landslide : भिंत खचली, चूल विझली! जेव्हा पाऊस काळ बनून येतो..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रविवारचा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला आहे. चेंबूर परिसरातील माहुल भागात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मध्यरात्री घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आल्यामुळे मृतांचा आकडा १७ पर्यंत पोहचला आहे. या भागात अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचं बचावकार्य अजुनही सुरु आहे.

हे वाचलं का?

भूस्खलनामुळे माहुल येथे घरांची झालेली अवस्था. एका झाडाची फांदी घरावर कोसळून हा अपघात झाल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

अनेक कष्टकरी वर्ग या भागात राहतो. परंतू एक दिवसाच्या पावसाने या लोकांच्या संसारात अशा पद्धतीने पाणी आणि चिखल फिरवला आहे.

ADVERTISEMENT

या दुर्घटनेत अनेक घरांचं नुकसान झालं असून आता या नुकसानातून स्वतःला कसं सावरायचं हा प्रश्न इथल्या लोकांपुढे आहे.

दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालयाने २ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

या अपघातानंतर मुंबईत दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचा प्रश्न पुन्हा एकदा प्रामुख्याने समोर आला आहे.

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर सकाळपर्यंत NDRF आणि अग्नीशमन दलाचे जवान डॉग स्कॉडच्या सहाय्याने रेस्क्यु ऑपरेशन पार पाडत होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT