Malad Building Collapse: मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले

Malad Building Collapse मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 9 जण एकाच कुटुंबातले

हे वाचलं का?

मुंबईतल्या मालाड भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात लोक जखमी झाले आहेत. मालाड पश्चिमेकडे असलेल्या मालवणी भागात ही इमारत होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमींवर उपचार सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. अशात मालाडमध्ये रात्री उशिराच्या सुमारास ही इमारत कोसळली. मालवणी भागात असलेली ही इमारत शेजी असलेल्या घरांवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील त्या ठिकाणी पोहचले. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली अशी माहिती त्यांनी दिली.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री 11.30 च्या दरम्यान घडली. सुरूवातीला आसपासच्या लोकांनी एकत्र येत 16 लोकांना वाचवलं. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असावेत अशी भीती व्यक्त होते आहे. ही चार मजली इमारत होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT