भिंतीवर चढून ग्रिल कापत करायचे चोरी, ‘स्पायडरमॅन’ चोर सापडले मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– शिवशंकर तिवारी, मुंबई प्रतिनिधी

ADVERTISEMENT

मुंबईतल्या मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीत घरांमध्ये चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अटक केली आहे. अब्दुल शेख आणि मनोज जैन अशी या चोरट्यांची नावं आहेत. मालाड परिसरात या दोन चोरट्यांनी लोकांची झोप उडवली होती. भिंतीवर चढून ग्रिल कापून हे चोरटे घरात शिरायचे आणि घरातले दाग-दागिने, रोख रक्कम घेऊन पळून जायचे. मालाड पोलिसांमध्ये चोरीच्या तक्रारी वाढायला लागल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एक पथक स्थापन करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

४३ वर्षीय अब्दुल शेखने मालाड परिसरातील घरांमध्ये चोऱ्या करुन पोलिसांना थेट आव्हान द्यायला सुरुवात केली होती. ७ फेब्रुवारी रोजी मालाड पोलीस ठाण्यात एका घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यात दोन घरांमधील मिळून १५ लाख रुपये रक्कम आणि २१ तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केलं होतं. मालाड, गोराई आणि इतर पोलीस ठाण्याच्या मिळून १६ अधिकाऱ्यांचं पथक या चोरट्यांचा शोध घेत होतं. अखेरीस तपासाअंती पोलिसांना अब्दुल शेखचा पत्ता सापडलाच.

हे वाचलं का?

व्हिडीओ कॉल करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर गळफास घेऊन मुलाने संपवलं आयुष्य

यानंतर पोलिसांनी एक पथक पाठवून आरोपीला गुजरातमधून अटक केली. आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने विकत घेणारा त्याचा साथीदार सराफ व्यवसायिक मनोज जैनलाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १५ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरट्यांनी आणखी किती ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली याचा शोध पोलीस अधिकारी घेत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT