प्राईज टॅग लावून तरूणींचे फोटो शेअर केल्याचा आरोप, मुंबईच्या 22 वर्षीय तरूणाला अटक
सोशल मीडिया हे सध्याचं अत्यंत प्रभावीपणे वापरलं जाणारं माध्यम आहे. कॉल गर्ल्स असा उल्लेख असलेले फोटो व्हायरल होत आहेत अशी तक्रार मुंबईतल्या काही महिलांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर अँटॉप हिल येथील एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यामागे शुभम गडलिंगे हा असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. तो प्राईज टॅग लावून तरूणींचे फोटो सोशल […]
ADVERTISEMENT
सोशल मीडिया हे सध्याचं अत्यंत प्रभावीपणे वापरलं जाणारं माध्यम आहे. कॉल गर्ल्स असा उल्लेख असलेले फोटो व्हायरल होत आहेत अशी तक्रार मुंबईतल्या काही महिलांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर अँटॉप हिल येथील एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यामागे शुभम गडलिंगे हा असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
ADVERTISEMENT
तो प्राईज टॅग लावून तरूणींचे फोटो सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर शेअर करत होता असाही आरोप आहे. इंस्टाग्रामवर आणि टेलिग्रामवर या सगळ्यांची बनावट अकाऊंट त्याने तयार केली आणि त्यावर कॉल गर्ल असा उल्लेख करत प्राईज टॅगही लावला. मिड-डे या वेबसाईटने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
औरंगाबादमध्ये दोन महिलांवर सामूहिक बलात्कार, सात ते आठ जणांनी घातला दरोडा
हे वाचलं का?
नेमकं काय आहे प्रकरण?
शुभम गडलिंगे या तरूणाने पैशांच्या मोबदल्यात लैंगिक सुखाचं आश्वासन देणाऱ्या महिलांची काही छायाचित्रं फॉलोअर्सना खासगीरित्या पाठवली असा आरोप त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलांनी केला आहे. या तक्रारदार महिला 12 ते 25 या वयोगटातल्या आहेत. या महिला आरोपीच्या शाळा, कॉलेज, सोसायटी, कौटुंबिक ओळखीतल्या किंवा नात्यातल्या आहेत. शुभम हा वाणिज्य शाखेचा पदवीधर असून त्याच्या पालकांनी त्याला कॅनडाला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT
बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच
ADVERTISEMENT
काही वर्षांपूर्वी शुभम सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींना संबंधित महिलांचे फोटो पाठवताना पकडल्यानंतर तक्रारदारांच्या पालकांनी त्याला मारहाण केली होती. या प्रकरणाबाबत एका अल्पवयीन मुलीने सांगितले की ‘काही दिवसांपूर्वी माझ्या मित्रांनी मला कळवले की कॉल गर्ल म्हणून माझे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. मला धक्काच बसला. माझा मित्र शुभमच्या या दुष्कृत्यांबद्दल मला माहिती होती. कारण त्याला यापूर्वी अनेक जणींच्या पालकांनी बेदम चोप दिला होता. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने आधी नकार दिला, मात्र नंतर त्याने त्याची कबुली दिली. मी लगेचच त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. नंतर, मला माझ्या अनेक मैत्रिणी याला बळी पडल्याचं समजलं. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.’ असं या पीडितेने म्हटलं आहे.
अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी शुभम गडलिंगेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला मागच्या आठवड्यात अटक केली होती. मात्र, अटकेनंतर एकाच दिवसात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. प्रेयसीसोबत नातं तुटल्यानंतर गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचं मनस्वास्थ्य ढासळले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी म्हणाले की, “आम्ही आरोपी शुभम गडलिंगेला अल्पवयीन मुली आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली. आम्ही दोन-तीन मुलींचे जबाब नोंदवले आहेत. आम्हाला शंका आहे की 150-200 पेक्षा जास्त जणी याला बळी पडल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्याची जामिनावर सुटका झाल्यामुळे आम्हाला त्याची पुरेशी पोलीस कोठडी मिळाली नाही. त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले की तो नैराश्याने ग्रस्त आहे. आम्ही त्याची वैद्यकीय कागदपत्रे तपासत आहोत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT