पुणेरी भामट्याचा सातारच्या व्यक्तीला गंडा, ट्रायल घेण्याच्या बहाण्याने बुलेट घेऊन झाला पसार
पुणेरी भामटा हा शब्दप्रयोग आपण आतापर्यंत अनेकदा ऐकला असेल. सातारा शहरातील मोटारसायकलची खरेदी-विक्रीचा व्यवसाय असलेल्या एका व्यक्तीला पुणेरी भामट्याने गंडा घातला आहे. बुलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल रन घेतो असं सांगत या भामट्याने पळ काढला आहे. सातारा शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात असणाऱ्या स्टार मोटर्सचे मालक आरिफ शेख यांचा खरेदी-विक्रीचा व्यावसाय आहे. आरिफ शेख यांनी […]
ADVERTISEMENT
पुणेरी भामटा हा शब्दप्रयोग आपण आतापर्यंत अनेकदा ऐकला असेल. सातारा शहरातील मोटारसायकलची खरेदी-विक्रीचा व्यवसाय असलेल्या एका व्यक्तीला पुणेरी भामट्याने गंडा घातला आहे. बुलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल रन घेतो असं सांगत या भामट्याने पळ काढला आहे.
ADVERTISEMENT
सातारा शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात असणाऱ्या स्टार मोटर्सचे मालक आरिफ शेख यांचा खरेदी-विक्रीचा व्यावसाय आहे. आरिफ शेख यांनी फेसबुकवर आपली बुलेट विकायची आहे अशी पोस्ट केली होती. ती पोस्ट फेसबुक पाहून पुणे येथील एका व्यक्तीने आरिफ शेख यांना फेसबुकवर मेसेज केला. प्राथमिक चौकशीनंतर या दोघांनीही बुलेटचा सौदा पक्का केला.
ठरल्याप्रमाणे हा व्यक्ती पुण्यावरुन साताऱ्याला दाखल झाला. साताऱ्यात दाखल झाल्यानंतर या भामट्याने बुलेटची ट्रायल घेतो असं सांगत गाडी चालवायला मागितली. आरीफ शेख यांनी गाडी दिल्यानंतर हा भामटा तिकडून पसार झाला. ४ तास उलटून गेल्यानंतरही हा व्यक्ती परत आला नसल्यामुळे आरीफ शेख यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT