मनोज वाजपेयीचं मोठं विधान; ….त्यांच्यामुळे मला कोरोनाची लागण झाली
कोरोनाच्या रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. अनेक बॉलिवूड कलाकारांनाही नुकंतच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यामध्ये रणबीर कपूर, सिद्धार्थ चतुर्वेदी, संजय लीला भन्साळी तसंच मनोज वायपेयी यांना कोरोनाची लागण झालीये. तर कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेता मनोज वाजपेयीने मोठं विधान केलं आहे. मनोजने त्यांची अपकमिंग फिल्म सायलेंस- कॅन यू हिअर इट च्या वर्च्युअल ट्रेलर लाँचिंग […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. अनेक बॉलिवूड कलाकारांनाही नुकंतच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यामध्ये रणबीर कपूर, सिद्धार्थ चतुर्वेदी, संजय लीला भन्साळी तसंच मनोज वायपेयी यांना कोरोनाची लागण झालीये. तर कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेता मनोज वाजपेयीने मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
मनोजने त्यांची अपकमिंग फिल्म सायलेंस- कॅन यू हिअर इट च्या वर्च्युअल ट्रेलर लाँचिंग दरम्यान कोविड पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने कोरोनाची लागण होण्यामागे मोठं कारण असल्याचं म्हटलंय. मनोज म्हणतो, “कोरोनाची लागण झाल्यामुळे मी क्वारंटाईनमध्ये आहे. मला कोरोनाची लागण झाली कारण इतर व्यक्तींनी कोविडच्या नियंमांचं पालन केलं नाही.”
हे वाचलं का?
यावेळी मनोजने कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही. मात्र कोरोनाची बाधा होण्यामागे त्याने इतरांना जबाबदार धरलं आहे. मनोज पुढे म्हणतो, “जर तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉल्स पालन करत असाल तर कोणतीही अडचण नाही. प्रोडक्शन हाऊसकडून कोविडचे सर्व प्रोटोकॉल पाळले जात असल्याचं निश्चित करण्यात आलं होतं. नियमांचं पालन केलं गेलं, म्हणून आम्ही चित्रपट पूर्ण करू शकलो. सध्या सॅनिटायझर्स आणि मास्क जीवनाचा एक भाग बनलेत. मात्र आपण काम करत राहिलं पाहिजे.”
ADVERTISEMENT
मनोज वाजपेयी सध्या Despatch या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. रॉनी स्क्रूवाला यांचा हा सिनेमा असून मनोज या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. यापूर्वी या सिनेमाचे डायरेक्टर कानू बहल यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT