Kabul Airport : भारतीयांसह १५० नागरिकांचं तालिबानने केलं अपहरण?; भारत सरकारने केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात परतण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या १५० भारतीयांना तालिबाननं पकडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काबूल विमानतळ परिसरात भारतीयांना पकडलं गेलं असल्याची माहिती आहे. दरम्यान, हे वृत्त तालिबाननं फेटाळून लावलं आहे.

ADVERTISEMENT

अफगाणिस्तानातील काही स्थानिक माध्यमांनी तालिबानकडून अनेक नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे. अफगाणिस्तानातून मायदेशी परण्यासाठी काबूल विमानतळावर प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांचं अपहरण करण्यात आलं असून, यात असल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.

काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी तालिबानने १५० नागरिकांचं अपहरण केलं असल्याचं वृत्त काबूल नाऊ या माध्यमाने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. १५० नागरिक असून, यात भारतीयांची संख्या मोठी असल्याचं वृत्तात म्हटलेलं आहे. तालिबानशी संबंधित असलेल्या व्यक्तीने हे अपहरणकांड केल्याचंही वृत्तात म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

एएनआय या वृत्तसंस्थेनंही अफगाणिस्तानी माध्यमांचा हवाला देत तालिबाननं १५० नागरिकांना ताब्यात घेतलं असल्याचं म्हटलं आहे. विमानतळावर प्रतीक्षा करत असलेल्या नागरिकांना पकडण्यात आलं असून, याबद्दल अधिकाऱ्यांकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

दुसरीकडे भारतीयांसह १५० नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त तालिबाननं फेटाळून लावलं आहे. तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्लाह वासिकने याबद्दल भूमिका मांडली आहे.

ADVERTISEMENT

विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलेल सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्यांनी नागरिकांचे पासपोर्ट तपासले आणि चौकशी केली. त्यानंतर सर्व नागरिकांना काबूल विमानतळाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. ते काबूल विमानतळाच्या जवळ असल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, केंद्र सरकारने सर्व नागरिक सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारतीय अधिकारी नागरिकांच्या संपर्कात आहेत. काबूलमध्ये अधिकारी भारतीयांना मदत करण्यासाठी सज्ज असून, विमानतळाबाहेरील नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी कार्यरत असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT