राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत पक्ष कार्यकर्त्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित केलं. आपल्या भाषणात शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढताना राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांना हात घातला. राज ठाकरे यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता स्वतः या सभेला हजर होती. ज्याचा व्हिडीओही तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

उफ्फ तेरी अदा…प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हालाही पाडेल प्रेमात

हे वाचलं का?

प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दलची माहिती देताना, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नसून खूप दिवसांपासून राजकीय सभा अनुभवायची होती, ती काल पहिल्यांदा अनुभवली असं सांगितलं आहे. पाहा काय म्हणाली प्राजक्ता…

कलाकार होण्याआधी मी माणूस आहे आणि त्याच्या समृद्धीसाठी झटायला हवं. जस फिल्मफेअरला जाणं गरजेचं तसंच हे देखील म्हणून हा घाट अशी प्रतिक्रीया प्राजक्ताने दिली आहे.

ADVERTISEMENT

बोल्ड अँड ब्युटीफुल, प्राजक्ता म्हणतेय आँखो से आँखे चार करने दो…

ADVERTISEMENT

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. टिव्ही मालिकांपासून सुरुवात केलेल्या प्राजक्ता माळीने चित्रपट सृष्टीत आपलं नाणं गेल्या काही वर्षांत खणखणीत वाजवून दाखवलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचे तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं अँकरिंग करते आहे.

पारंपरिक ते फॅशनेबल, प्रत्येक साडीत प्राजक्ताचा अंदाज पाडेल तुम्हाला प्रेमात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT