लाइव्ह
Marathi News Live : बाळासाहेब ठाकरे वाघ होते, पण उद्धव ठाकरे वाघ नाहीत- देवेंद्र फडणवीस
Marathi News Live Update : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसला असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सूरूवात होत आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून या यात्रेला सुरूवात होईल. यासह राज्य आणि देशभरातील राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग करा फॉलो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 07:11 PM • 14 Jan 2024
बाळासाहेब ठाकरे वाघ होते, पण उद्धव ठाकरे वाघ नाहीत- देवेंद्र फडणवीस
'मी कारसेवक आहे, मी रामसेवक' असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी हो मी विसाव्या वर्षी कारसेवेला गेलो मात्र तुमचं वय होतं त्यावेळी तुम्ही काय करत होता. त्यावेळी तुम्ही जंगलातील वाघांचे फोटो काढत फिरत होता असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे एकटेच वाघ होते मात्र तुम्ही वाघ नसल्याचे सांगत त्यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. - 05:39 PM • 14 Jan 2024
विकासाच्या राजकारणामुळे मी एकनाथ शिंदेंसोबत- मिलिंद देवरा
विकासाच्या राजकारणामुळे मी एकनाथ शिंदेंसोबत- मिलिंद देवरामाजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मोठे व्हिजन असून त्यांच्या विकासाच्या राजकारणावर माझा विश्वास असल्याचे मिलिंदे देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मुंबईती चाळीत राहणाऱ्या माणसांच्या अपेक्षा काय आहे, त्यांची इच्छा काय आहे. त्याची जाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्यामुळेच त्यांच्यासोबत जाऊन त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले. - 01:42 PM • 14 Jan 2024
CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं, मोदींच्या नखाची सर...
mumbaitak - 11:59 AM • 14 Jan 2024
स्व. मुरली देवरा यांना तुमचा निर्णय आवडला नसेल- बाळासाहेब थोरात
mumbaitak - 11:00 AM • 14 Jan 2024
मिलिंद देवरा यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा- वर्षा गायकवाड
काँग्रेस परिवार एक कुटुंब आहे. देवरा परिवार आणि काँग्रेस हे एक वेगळे समीकरण आहे. त्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी मिलिंद देवरा यांना केली आहे. - 10:42 AM • 14 Jan 2024
दिल्लीतील दोन अनौरस बापांच्या ताकदीवर...
mumbaitak - 10:10 AM • 14 Jan 2024
मुरली देवरा प्रखर काँग्रेसवासी होते- जयराम रमेश
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. मुरली देवरा यांच्यासोबतचा माझा प्रदीर्घ वर्षांचा सहवास मला मोठ्या प्रेमाने आठवतो. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जिवलग मित्र होते, परंतु ते काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेले एक प्रखर काँग्रेसवासी होते. आणि तथास्तु! - 10:06 AM • 14 Jan 2024
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
आपण हा निर्णय घेतला हे दुर्दैव आहे. वैयक्तिक पातळीवर आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आज मला वाईट वाटते.देवरा कुटुंबाचा काँग्रेस परिवाराशी दीर्घकाळ संबंध आहे. आम्ही सर्वजण हे पाऊल उचलण्याविरुद्ध तुमची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होतो. पक्ष नेतृत्वही तुमच्यापर्यंत पोहोचले. हे देखील खेदजनक आहे की ज्या दिवशी पक्ष ऐतिहासिक #BharatJodoNyayYatra सुरू करत आहे त्या दिवशी तुमची घोषणा आली, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. - 09:19 AM • 14 Jan 2024
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा राजीनामा
mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT