लाइव्ह

NCP Breaking News Live : शरद पवार गटाला मिळालं नवे नाव, निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवारांचा पक्ष आणि चिन्हाबाबतचा इतिहास
Sharad Pawar
social share
google news

Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अखेर अजित पवार गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात मंगळवारी निर्णय दिला. त्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे. या सह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 12:09 PM • 08 Feb 2024

    Mood OF The Nation : उत्तराखंडमध्ये भाजप क्लीन स्वीप करणार

    उत्तराखंडमध्ये भाजप क्लीन स्वीप करताना दिसत असल्याचे मूड ऑफ द नेशनमध्ये उघड झाले आहे.  लोकसभेच्या पाच जागा आहेत, त्यावर भाजप विजयी होताना दिसत आहे. याशिवाय भाजपची मतांची टक्केवारी 58.6 टक्के आहे. तर काँग्रेस शून्यावर आलेली दिसते. त्यांची मतांची टक्केवारी जवळपास 32 टक्के असल्याचे दिसते.

     उत्तराखंड
     भाजप : 05
     काँग्रेस : 00

  • 12:07 PM • 08 Feb 2024

    Mood OF The Nation : उत्तरप्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळणार

    मूड ऑफ द नेशनलचा पहिला डेटा समोर आला आहे, ज्यामध्ये यूपीमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 49 टक्क्यांवरून 52 टक्क्यांवर पोहोचली आहे, ज्यामध्ये भाजपला 70 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय काँग्रेसला एक जागा आणि समाजवादी पक्षाला सात जागा मिळाल्याचे दिसत आहे. त्याचवेळी मायावतींचा पक्ष बसपा यावेळी पुन्हा शून्यावर पोहोचताना दिसत आहे. तर एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या अनुप्रिया पटेल यांचा पक्ष अपना दलालाही दोन जागा मिळाल्या आहेत.

    उत्तर प्रदेश
    भाजप  : 70 
    काँग्रेस : 1
    सपा : 7 
    अपना दल  : 2
    बसपा : 0  

  • 06:20 PM • 07 Feb 2024

    NCP Breaking News Live : शरद पवार गटाला मिळालं पक्षाचं नाव

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं. त्यानंतर आता शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. 

     

    Sharad pawar faction party name annouced by eci
    शरद पवार गटाला देण्यात आलेले निवडणूक आयोगाचे पत्र.
  • 03:34 PM • 07 Feb 2024

    Narendra Modi Live : 'काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला'

    भाजपने एका महिला आदिवासीला देशाचे राष्ट्रपती केले होते. पण आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनण्यासाठी काँग्रेसने 
    विरोध दर्शवला. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली 

  • ADVERTISEMENT

  • 03:29 PM • 07 Feb 2024

    Narendra Modi Live : पंतप्रधान मोदींची आरक्षणावरून नेहरूंवर टीका

    मला कोणतेच आरक्षण आवडत नाही.नोकरीतही आरक्षण आवडत नाही. मी अशा निर्णयाच्या विरोधात आहेत. जे अकुशलतेच्या दिशेने नेईल आणि दुय्यम दर्जाची वागणूक देईल, असे नेहरूंनी चिठ्ठीत लिहले होते. त्यामुळे हे जन्मजात आरक्षणाचे विरोधी होते, असा घणाघात मोदींनी काँग्रेसवर केला. 

  • 03:23 PM • 07 Feb 2024

    Narendra Modi Live : PM मोदींचा राहुल गांधींना टोला

    ज्या काँग्रेसच्या पक्षाच्या आपल्या नेत्याची काही गँरंटी नाही आहे. पक्षाच्या नितीची काही गँरंटी नाही आहे. ते मोदीच्या गँरंटीवर प्रश्न उपस्थित करतात. 

  • ADVERTISEMENT

  • 02:25 PM • 07 Feb 2024

    Narendra Modi Live : मोदींचे काँग्रेसला टोले, टोमणे; राज्यसभेतील शेवटच्या भाषणात काय बोलले?

    राज्यसभेतील शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक आणि काँग्रेसवर चौफेर टोलेबाजी केली आहे. मी खर्गेंचे विशेष आभार मानतो. मी त्यांचे भाषण खूप लक्षपूर्वक ऐकत होते. पण आझादी मिळाली कशी? दोन स्पेशल कमांडर नव्हते म्हणून आझादींचा त्यांनी फायदा उचलला, असे विधान करून मोदींनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणलाय.

  • 01:25 PM • 07 Feb 2024

    Maharashtra Breaking Live: फडणवीसांच्या नागपूरातील कार्यक्रमातच मोठा राडा

    नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमात मोठा राडा झाला आहे. 

  • 12:30 PM • 07 Feb 2024

    Ncp Live Updates : शरद पवार गटाचा निर्णय झाला, सुप्रिया सुळेंनी सांगितला पुढचा प्लॅन

    "आम्ही आज दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर देऊ आणि निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाऊ. चिन्हाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही."
     

  • 12:16 PM • 07 Feb 2024

    NCP Live : अभिनेत्री तेजस्वीनी पंडित शरद पवारांच्या बाजूने

    जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !

  • 10:47 AM • 07 Feb 2024

    NCP LIVE : आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

    'इलेक्शन कमिशन खरोखर 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' आहे का? तसेच पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की, EC म्हणजे Entirely Compromised! तडजोड बहाद्दर!'
  • 10:42 AM • 07 Feb 2024

    NCP LIVE : राष्ट्रवादी अजित पवारांची! शरद पवारांकडे काय पर्याय उरला?

    राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अखेर अजित पवार गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात मंगळवारी निर्णय दिला आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT