लाइव्ह
MarathI News Live : तुम्ही जर दबाव निर्माण करत असाल तर आम्हीही मेल्या आईचं दूध प्यायलो नाही-छगन भुजबळ
Marathi News Live Update : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू आज सकाळी 8 वाजेपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यासह राज्यातील इतर बातम्यासांठी मुंबई तकचा लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 08:11 PM • 13 Jan 2024
MarathI News Live : तुम्ही जर दबाव निर्माण करत असाल तर आम्हीही मेल्या आईचं दूध प्यायलो नाही-छगन भुजबळ
तुम्ही जर दबाव निर्माण करण्यासाठी वाटेल त्या धमक्या देत असाल तर आम्हीही काही मेल्या आईचं दूध प्यायलो नाही असा थेट इशाराच छगन भुजबळ यांनी आजच्या एल्गार मेळाव्यातून देण्यात आला. ते जर दबाव निर्माण करत असाल तर दलित, आदिवासी आणि ओबीसी वर्गानेही मग दबाव निर्माण करायला पाहिजे असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. आज ओबीसी समाज धोक्यात आहेत. मात्र आजच्या काळात प्रत्येक वर्गाचे आरक्षण धोक्यात येत असल्याचे सांगत जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. - 08:01 PM • 13 Jan 2024
ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही जबाबदारी सरकारची- छगन भुजबळ
तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला आलात तर आम्ही तुमच्याविरोधात जाणारच आहेत. ओबीसीमध्ये जे आहेत. त्यांना सगळ्यांना बाहेर काढा अशी एकीकडे मागणी केली जाते तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या अशी कशी काय मागणी तुम्ही करु शकता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि त्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. - 07:58 PM • 13 Jan 2024
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही-छगन भुजबळ
मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले असल्याचे सांगत तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. कारण त्यासाठी अनेक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी आजच्या एल्गार मेळाव्यातून स्पष्ट केले. - 07:47 PM • 13 Jan 2024
आमच्या विरोधात जे शक्ती देतात त्यांना जागा दाखवणार- छगन भुजबळ
आरक्षणासाठी आमच्या विरोधात जे शक्ती देतात, त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आम्ही जागा दाखवली जाईल असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये दिला आहे. जी लोकं नेत्यांविषयी नको ती भाषा बोलतात, त्यांना योग्य ती जागा दाखवली जाईल असा इशाराही छगन भुजबळ यांनी दिला आहे. - 07:00 PM • 13 Jan 2024
ठाकरे गटाचे आठ आमदार आमच्या संपर्कात-नारायण राणे
शिवसेना आता संपली असून त्यांचे आठ आमदार संपर्कात असल्याचे सांगत मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा माणसाचे नावही माझ्यासमोर घेऊ नका कारण आता उद्धव ठाकरे शिवसेना संपली असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला. जी काही शिवसेना उरली आहे, त्यातील आठ आमदार आता आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कल्याण-डोंबिवली मतदार संघ हा कोणाची जहांगीरी नाही. येत्या निवडणुकीत डुप्लिकेट कोण आणि खरा शिवसैनिक कोण कळेल अशी टीका त्यांनी केली होती, त्याला उत्तर देताना नारायण राणे यांनी खोचकपणे त्यांना सवाल केले आहेत. - 06:08 PM • 13 Jan 2024
नारायण राणेंची ठाकरेंवर खोचक टीका, मातोश्रीतल्या बिनकामी माणसाचा...
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूना आमंत्रण द्या असे उद्धव ठाकरे आज माध्यमांशी बोलताना सांगितले होते. ठाकरेंच्या या मागणीचा प्रश्न नारायण राणे यांना विचारला असता.कोण उद्धव ठाकरे? ते क़ाय माझे मार्गदर्शक आहेत का? त्यांना कोण विचारते? घरी बसला आहे बस. मातोश्रीमधे बिनकामाच्या माणसाचा प्रश्न मला विचारु नका असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. पालघर डहाणू येथील लाभार्थी मेळावा व जिल्हा कार्यकारीणी बैठकीदरम्यान ते बोलत होते. - 12:28 PM • 13 Jan 2024
...म्हणून ठाकरेंची अशी अवस्था झाली, CM शिंदेंनी वर्मावर ठेवलं बोट
mumbaitak - 10:39 AM • 13 Jan 2024
ठाकरेंची मोठी घोषणा, 22 तारखेला अयोध्येत नव्हे तर या ठिकाणी जाणार
mumbaitak - 10:11 AM • 13 Jan 2024
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद LIVE
- 09:34 AM • 13 Jan 2024
सत्यशोधक सिनेमा सर्व शाळांमध्ये दाखवावा- शरद पवार
mumbaitak - 09:26 AM • 13 Jan 2024
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे लावणार सुरुंग?
आमदार अपात्रतेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर आहेत. कल्याण हा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यातून ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंवर काय टीका करतात?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT