लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : ठाकरे गटाचे भाजपला प्रत्युत्तर, ‘क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधान…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

 • 04:27 PM • 06 Feb 2024

  मुंबई कामाठीपुरा परिसरातील इमारतीला भीषण आग

  मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे.
 • 03:24 PM • 06 Feb 2024

  ठाकरे गटाचे भाजपला प्रत्युत्तर, क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधान...

  भाजपने उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचा फोटो ट्विट करून मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी म्हणत ठाकरेंना डिवचलं होते. आता ठाकरेंनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये,असा टोला ठाकरेंनी लगावला. तसेच तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडीट मिळणार नाहीच!, अशी टीका देखील ठाकरेंनी भाजपवर केली.
 • 03:07 PM • 06 Feb 2024

  तुझे उपकार आम्ही..., भुजबळांनी जरांगेंकडे केली मोठी मागणी

  ओबीसी नवीन पक्ष राजकीय पक्ष काढणार असल्याचे बोलले जात आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, नवीन पक्ष काढण्याचा विचार केला तर ही सगळी मंडळी काय करणार? त्याच्यामुळे मतप्रवाह वाहायला सुरुवात होईल आणि जे ओबीसी एकत्र येतायत त्याच्यातही खंड पडायला सुरूवात होईल. त्यामुळे याचा देखील विचार करायला हवा असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
 • 12:13 PM • 06 Feb 2024

  महायुतीतील तीनही पक्ष स्वतःची गँग..., वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

  निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात! निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गैंग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा.
 • ADVERTISEMENT

 • 10:01 AM • 06 Feb 2024

  जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार!

  मनोज जरांगे हे आळंदी आणि मुंबई दोन दिवसांचा दौरा करणार असून ते आज अंतरवली सराटी वरून 12 वाजता निघणार आहेत. आळंदी येथे स्वागताचा कार्यक्रम आहे, तर 7 फेब्रुवारीला मुंबईत कामोठे येथे कार्यक्रम होणार असून, जरांगेंची मुंबईत समाजाच्या लोकांशी बैठक देखील होणार आहे. 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला नाशिक आणि बीडमधील कार्यक्रम आटोपून ते जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल होतील.
 • 09:44 AM • 06 Feb 2024

  सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावरची पट्टी उघडून...रोहित पवार काय म्हणाले?

  सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावरील पट्टी खोलून चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाल्याची टिप्पणी करुन भाजपाच्या आणि भाजपाचे सालगडी असल्याप्रमाणे काम करणाऱ्या नोकरशाहीच्या कानाखाली सणसणीत लगावली. अपेक्षा फक्त एकच आहे की, ही हत्या करणारा आणि त्यामागील मास्टरमाईंड या दोघांनाही या ‘खून’प्रकरणी योग्य वेळेत शिक्षा होईल आणि लोकशाहीला न्याय मिळेल.
 • ADVERTISEMENT

 • 08:35 AM • 06 Feb 2024

  ठाकरेंचं मिशन कोकण! या तारखेला पुन्हा कोकण दौऱ्यावर

  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते गुहागर, दापोलीसह मंडणगड भागात दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं 'मिशन कोकण' सुरु होणार आहे.
 • 08:35 AM • 06 Feb 2024

  उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा वंदे भारतने प्रवास

  उद्धव ठाकरे कोकण दौरा आटोपून मुंबईला परतले आहेत. यावेळी चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना ठाकरेंनी रेल्वे मार्गाने परत येणे पसंत केले. ठाकरेंनी वंदे भारत ट्रेनने चिपळूण ते मुंबई प्रवास असा सपत्नीक प्रवास केला.
follow whatsapp

ADVERTISEMENT